भिमजयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी विशाल जाधव उपाध्यक्षपदी संतोष जाधव तर सचिवपदी अविनाश घोडके यांची सर्वानुमते निवड

 भिमजयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी विशाल जाधव उपाध्यक्षपदी संतोष जाधव तर सचिवपदी अविनाश घोडके यांची सर्वानुमते निवड



--------------------------------------

आष्टी/प्रतिनिधी

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त कडा शहरातील बुद्ध विहारात आज दिनांक १ मार्च रोजी राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

सालाबादप्रमाणे याहीवर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कडा शहरात धुमधडाक्यात साजरी होणार आहे.तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची ११ एप्रिल रोजी जयंती असल्याने कडा शहरात ११ एप्रिल ते १४ एप्रिल पासून विविध सामाजिक विषयांवर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात.

त्याचअनुषंगाने यंदाही विविध सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती भिमजयंती कमिटीच्या वतीने दिली आहे.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष विशाल जाधव, उपाध्यक्ष संतोष जाधव, सचिव अविनाश घोडके,खजीनदार सुमित जाधव,अदित्य गरुड,सागर घोडके, निखील जाधव आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

यावेळी सुनिल जाधव, राहुल जाधव,अशोक जाधव, गोविंद मिश्रा, सुरेश घोडके, सुभाष भादवे सर,विशाल घोडके, अतुल शिरोळे, संतोष साळवे,बंटी घोडके, सचिन जाधव,बालाजी मंजूळे,सोनू जाधव,रमेश जाधव,दिपक बोराडे, सचिन शिंदे, गणेश शिरोळे,शेखर पवार,राजू साळवे, कमलेश जाधव,सागर जाधव, रोहीत घोडके,दासा शिरोळे,सह सर्व भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुत्रसंचलन पत्रकार संदिप जाधव यांनी केले तर आभार सुनिल जाधव यांनी मानले.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.