शिरापूर येथील युवकाचा ट्रॅक्टर खाली चिरडुन मृत्यू.

 शिरापूर येथील युवकाचा ट्रॅक्टर खाली चिरडुन मृत्यू.




कडा/प्रतिनिधी.


आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील 24 वर्षीय युवक सौरभ लक्ष्मण जीवे हा युवक 29 फेब्रुवारी च्या मध्यरात्री ट्रॅक्टर खाली चिरडुन मृत्यू झाल्याची घटना कडा ते टाकळी आमिया रस्त्यावर घडली.

सौरभ लक्ष्मण जिवे व त्याचे वडील लक्ष्मण जिवे हे स्वतः च्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने स्वतःच्या शेतामध्ये रात्रीच्या वेळी नांगरणी करत होते नांगरणी उरकल्यावर नांगर सोडण्यासाठी मामाच्या गावी शेरी बुद्रुक येथे नांगर सोडला व आपल्या शिरापुर गावी परत जात असताना कडा ते टाकळी आमिया रस्त्यावर ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली गेल्याने खाली खड्डा असल्याने ट्रॅक्टर पलटी झाला व सौरभ लक्ष्मण जिवे हा युवक ट्रॅक्टर खाली चिरडुन मृत्यू झाला व वडील लक्ष्मण जिवे हे बाजुला उडून पडलें त्यामुळे ते त्यांचा जीव वाचला  .

परंतू रात्रीच्या वेळी कोणीही नसल्याने वडील लक्ष्मण जिवे हे पुर्णपणे घाबरले होते .

लक्ष्मण जिवे यांनी धीर न सोडता त्यांनी रात्री 1  वाजेच्या वेळी   नातेवाईक यांना फोन करून सर्व माहिती सांगितली  नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व प्रकार कडा येथील पोलिस ठाण्यात कळवला पोलीसांनी घटना स्थळी धाव घेतली व त्यानी हेड कॉन्स्टेबल दीपक भोज व ओ हेड कॉन्स्टेबल सचिन गायकवाड यांनी ट्रॅक्टर बाजूला काढून मयत सौरभ लक्ष्मण जीवे यांना  प्रेत प्राथमिक आरोग्य केंद्र कडा येथे 

शवचिकित्सा साठी ठेवण्यात आले व शवचिकित्सा झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला .

सौरभ लक्ष्मण जिवे यांचा अंत्यविधी शिरापुर मशान भउमईत करण्यात आला.

सौरभ लक्ष्मण जिवे यांच्या जाण्याने शिरापुर गावावर शोककळा पसरली.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.