ऊद्या सोलापुरवाडी येथे ब्रम्हलिन माणिकगिरी महाराज व विठ्ठ्ल रुख्मिणी मुर्ती प्रणप्तीष्ठा सोहळ्यास ऊपस्थीत रहावे.
सोलापुरवाडी ता आष्टी येथे ब्रम्हलिन माणिकगिरी महाराज यांचे भव्य दिव्य असे मंदिर सोलापुरवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने बांधन्यात आले आहे व याच मंदिराचे कलशारोहन व ब्रम्हलिन माणिकगिरी महाराज व विठ्ठ्ल रुख्मिणी मुर्ती प्रणप्रतिष्ठा सोहळा रविवार दि. ०३/०३/२०२४ रोजी दुपारी ४ वाजता सोलापुरवाडी येथे निष्ठावंत वारकरी ह.भ.प. भिम दादा आळंदी, ह.भ.प. दत्तगीरी महाराज वरवंडी, ह.भ.प. परमेश्वर महाराज शास्त्री शेकापुर यांचे हस्ते होणार आहे. याच निमात्ताने सोमवार दि.२६/०२/२०२४ पासुन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायन सोहळ्याचे आयोजन केले आहे. व सोमवार दि. ०४/०३/२०२४ रोजी ह.भ.प. एकनाथ महाराज शास्री यांच्या ९ ते ११ काल्याच्या कीर्तनाने समारोप रोईल.
माणिकबाबा यांनी वाहीरा ता आष्टी येथे व वरवंडी ता. संगमनेर आणि ताराहाबाद ता.राहुरी येथे भव्य दिव्य अशा विठ्ठल रुख्मिणी व बाबांचे गुरु महीपती महाराजांच्या मंदीरांची स्थापना करुन अखंड ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायण आयुष्यभर केले. यामधे आष्टी तालुक्यातील व नगर जिल्यातील अनेक गावांचा समावेश असायचा.त्याच अनुशंगाने बाबांचे विचार असेच सर्वदुर पोहचावेत यासाठी सोलापुरवाडी येथे होनार्या बाबांचा भव्य दिव्य अशा मंदीराचे कलशारोहन व मुर्ती प्रणप्रतिष्ठा सोहळ्यास मोठ्या संख्येने ऊपस्थीत राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती सोलापुरवाडी,खुंटेफळ, पुंडी व कुंबेफळ पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.


stay connected