सरपंचानेच विकली गावठाणची दोन एकर जमीन
उपसरपंचाने केली सरपंचाच्या राजिनाम्याची मागणी
कुंबेफळ येथील प्रकार
आष्टी ( प्रतिनिधी ) -
कुंभेफळ ता. आष्टी जि. बीड येथील गावठाण जमीन क्षेत्र एकून २ एकर (० हे ८० आर) परस्पर मालकी हक्काने नांवे केल्या प्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुंबेफळ चे उपसरपंच किशोर भगवान काकडे व इतर ग्रामस्थांनी केली आहे. तहसिलदार ,गटविकास अधिकारी आष्टी तसेच अंभोरा पोलीस ठाणे येथे त्यांनी तक्रारही दाखल केली आहे . तहसिलदार आष्टी यांना दिलेल्या निवेदनात उपसरपंच किशोर भगवान काकडे यांनी निवेदन केले आहे की मी कुंभेफळ गावचा कायमचा रहिवासी असुन मी गावचा उपसरपंच आहे. मौजे कुंभेफळ ता. आष्टी जि.बीड येथील ग्रामपंचायत गावठाण हदद्दीतील साधारण क्षेत्र २ एकर (० हे ८० आर) हे ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमताने गावातील व बाहेरगावातील त्यांच्या वतीचे व नातेवाईक, अप्तेष्ट व जवळील व्यक्तींकडून चांगल्याप्रमाणात चिरीमिरी घेवून परस्पर शासनाची गावठाण जमिन त्यांच्या मालकी हक्काने नांवे ८/अ रेकॉर्डला करून दिली आहे.
तरी या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपण स्वतः गांभीयनि लक्ष घालून सबंधीत व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी . तसेच सरपंचाने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही उपसरपंच किशोर काकडे तसेच शिवाजी श्रीपती गाडे , बाबासाहेब आप्पासाहेब मुठे , अनिल मोहन शिंदे , देविदास मल्हारी गाडे यांनी केली आहे .
stay connected