प्रसिद्ध चित्रकार सतिश शिंदे यांची रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड विक्रमामध्ये नोंद

 *प्रसिद्ध चित्रकार सतिश  शिंदे यांची रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड विक्रमामध्ये नोंद*



-----------------------------------

*रेमन मॅगसेसे आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा यांच्या हस्ते “ प्रतिभावान रांगोळी कलाकार ” म्हणून गौरव*

==================

*आष्टी/ प्रतिनिधी*

*रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स ( आरटीबीआर ) द्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिभा , गुणवत्ता , सेवाभाव , कर्तृत्व आणि बुद्धिमत्तेमुळे असामान्य कार्य करणाऱ्या मुलांना , महिला - पुरुष व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार देण्याचे कार्य केले जाते . जे कार्य उत्तम , उदात्त व उन्नत आहे , त्याची दखल घेवून त्या कार्यामागील राष्ट्रधर्मासाठी तत्पर कार्यवीरांची नोंद करणे व त्यांना गौरवान्वित करणे हे कार्य रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स ( आरटीबीआर ) द्वारे केल्या जाते . सन 2030 पर्यंत आंतरराष्ट्रीय मार्गदर्शित शाश्वत विकास उद्दिष्टांची उद्दिष्टे पूर्ण करण्याची वचनबद्धता आणि " विकसित भारत " या संकल्पनेचे तत्त्वनिष्ठ पालन हे रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स ( आरटीबीआर ) चे मार्गदर्शक तत्व आहे भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स अंतर्गत नोंदणीकृत वर्ल्ड सेव्हन वंडर्स पब्लिकेशन्स आणि नॅशनल कौन्सिल फॉर इन्स्पिरेशन अँड डेव्हलपमेंट ( एनसीआयडी ) द्वारे संचालित रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स (आरटीबीआर) हे रेकॉर्ड संपादन भारत सरकारच्या आयएसबीएन ( ISBN ) अंतर्गत प्रकाशित केले जाते .भारत आणि आशियाई देशांत आयोजित विविध समारोहांच्या माध्यमातून आरटीबीआर हे कीर्तिमान व अलंकरण बहाल केले जातात वस्तुतः विश्वशांती , राष्ट्रीय सुरक्षा  , जलसंस्कृती संवर्धन , आजीवन अध्यापन , राष्ट्रीय एकात्मता , सहिष्णुता , आंतरराष्ट्रीय सौहार्द , महिला सक्षमीकरण , आरोग्यसेवा , व्यसनमुक्ती , योगा - निसर्गोपचार , मैत्रीभाव , सैनिक कल्याण , कला - संस्कृती - क्रीडा - साहित्य संवर्धन , न्यायशास्त्र व मूल्य , नि:ष्पक्ष पत्रकारिता , उन्नत भारत व विकसित भारत या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या संकल्पसिद्धीकरीता रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स (आरटीबीआर) ही एकमेव स्वायत्त संस्था अत्यंत प्रभावीपणे जागतिक मंचावर क्रियाशील आहे . त्यामुळेच देशातील विविध  राज्यपाल,रेमेन मॅगसेसे विजेता,पद्मश्री विजेते , कुलगुरू,भारतीय लष्कर आणि हवाई दलाचे अधिकारी , पोलीस विभाग,आयएएस व आयपीएस अधिकारी , साहित्यिक,सीने अभिनेते ,नामवंत खेळाडू , उद्योगपती आणि गणमान्य व्यक्तींनी रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स (आरटीबीआर) च्या उपक्रमांना गौरविले आहे . अलीकडेच भारत सरकारने G-20 सचिवालयाच्या संचालक स्तरावर आणि भारताच्या राज्यपालांनी रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स (आरटीबीआर) चा सन्मान केला आहे . महत्वाचे म्हणजे वर्ल्ड सेव्हन वंडर्स पब्लिकेशन च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित झाले आहेत . यामुळेच प्रेरणा व प्रोत्साहन देणाऱ्या विक्रम-मानांकन जगतातील अत्युच्च गुणवत्ता जोपासून उदात्त उद्दिष्टांच्या पूर्ततेकरीता प्रतिबद्ध असणाऱ्या रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स ( आरटीबीआर ) मध्ये भारत देशासह संपूर्ण आशिया खंडातील इच्छुकगण त्यांची असामान्य प्रतिभा , कौशल्य , कार्य , प्राविण्य आणि बुद्धिमत्ता सादर करून नोंदणीसाठी अर्ज सादर करतात याच पार्श्वभूमीवर नुकत्याच महाराष्ट्रातील अमरावती शहरात संपन्न झालेल्या विशाल समारोहाच्या अनुषंगाने रेमन मॅगसेसे आणि पद्मश्री पुरस्कार विजेता नीलिमा मिश्रा यांच्यासह आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक आणि वर्ल्ड सेव्हन वंडर्स पब्लिकेशन व रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्सचे संस्थापक - मुख्य संपादक , एनसीआयडी व मिशन नॅचरोपॅथीचे संचालक तसेच भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकित जगप्रसिद्ध निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. क्रांती महाजन , चीफ एडज्यूकेटर ज्युरी व एनसीआयडी संचालक डॉ. एस. देवेंद्र आणि नॅशनल ज्युरी डॉ. गुरतेज सिंग ब्रार ( पंजाब ) , एनसीआयडी व्यवस्थापकीय संचालक डॉ. विजय वाढई ( पुणे ) , शांततादूत श्री. समीर शेंडे , समाजसेवी श्री. रविंद्र वैद्य व श्री. यशवंत कुर्वे ( नागपूर ) यांच्या शुभहस्ते महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील कलाकार प्रा. सतीश लक्ष्मण शिंदे यांना विशाल आकाराची कलात्मक रांगोळी काढणारे " प्रतिभाशाली रांगोळी कलाकार " म्हणून रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डस ( आरटीबीआर ) मध्ये समाविष्ठ करून गौरविण्यात आले आहे . कलाकार प्रा. सतिश लक्ष्मण शिंदे यांनी 1100 फूट लांबीचा लक्षवेधी रांगोळी पट्टा काढून आणि 5000 चौरस फूट आकाराची फुलांची भव्य रांगोळी बनवून कलेच्या क्षेत्रात आपले वेगळे कौशल्य व अनन्यत्व सिद्ध केले आहे . त्याचप्रमाणे अलिकडेच कलाकार प्रा. सतिश लक्ष्मण शिंदे यांनी आपल्या अंगभूत प्रतिभेच्या जोरावर 50 किलोग्राम रांगोळीचा वापर करून सलग 4.5 तासांच्या परिश्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य आकाराची चित्रमय रांगोळी साकारली आहे . यातूनच त्यांची प्रतिभा आणि रांगोळी काढण्याचे अप्रतिम कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरले आहे . याच अद्भुत व अनन्य गुणवत्तेदाखल कलाकार प्रा. सतिश लक्ष्मण शिंदे यांना रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ( आरटीबीआर ) तर्फे रेकॉर्ड क्लेम आयडी ( MH - RTBR / 2024 / 1703 / AWARD - 108 ) हे आंतरराष्ट्रीय कीर्तिमान प्रमाणपत्र , स्मृतीचिन्ह , गोल्ड-मेडल आणि मेम्बरशिप बहाल करून सन्मानित करण्यात आले आहे . या माध्यमातून कलाकार प्रा. सतिश लक्ष्मण शिंदे यांनी विकसित भारताचा पाया रचणाऱ्या आपल्या कलोपासक कर्तृत्वाने व समर्पित साधनेतून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करीत देशाचे नाव जागतिक मंचावर गौरविले आहे . त्यामुळे कलाकार सतिश लक्ष्मण शिंदे यांची रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ( आरटीबीआर ) मध्ये निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे .*




















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.