मराठा आरक्षणासाठी आत्मबलिदान दिलेल्या स्व. प्रवीण सोनवणे यांच्या कुटुंबीयांचे डॉ ज्योतिताई मेटे यांच्याकडून सांत्वन

 *मराठा आरक्षणासाठी आत्मबलिदान दिलेल्या स्व. प्रवीण सोनवणे यांच्या कुटुंबीयांचे डॉ ज्योतिताई मेटे यांच्याकडून सांत्वन*

------------------------------------------------------

*बीड जिल्ह्यात प्रवेश होताच  सामाजिक भान*




---------------------------------------------

आष्टी/प्रतिनिधी

ना कुठे गाजावाजा ना कुठे सत्कार, ना कुठे हारतुरे स्विकारत किंवा कोणत्याही प्रकारचा बडेजावपणा न करता आज डॉ.ज्योतिताई विनायकराव मेटे यांनी थेट मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्मबलिदान दिलेल्या कुटुंबाच्या घरी भेट देऊन सामाजिक जान ठेवून सांत्वन केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील अनेक दिवसांपासून लढ्यात सहभागी असलेल्या उच्च शिक्षित प्रविणने बेरोजगारीला कंटाळून व उच्च शिक्षण पूर्ण करून सुद्धा शासकीय स्तरावर आपली कुणबीची नोंद न सापडल्याने आपल्याला आरक्षण मिळनार नाही या नैराश्याने दि.१७ रविवारी पहाटेच्या सुमारास आपल्या व्हॉटसपवर मराठा आरक्षण संदर्भात स्टेटस ठेऊन  गळफास घेऊन आत्मबलिदान देऊन जीवन संपविल्याची घटना नुकतीच घडली होती. प्रवीण दिलीप सोनवणे असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

या विषयी सविस्तर माहिती अशी,आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक (कडा) ता.आष्टी येथील तरूण प्रवीण दिलीप सोनवणे हा उच्च शिक्षित तरुणांने मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने नैराश्यातुन आत्मबलिदान दिले होते, प्रवीण हा नेहमी मराठा आंदोलक मनोज जरांगे याच्या समर्थनार्थ राज्यातील विविध भागात अनेक ठिकाणी उपस्थित होत असे.एवढा मोठा लढा उभारून देखील आपल्या समाजाला आरक्षण मिळत नसल्याने त्याने रविवारी मोबाईलवर एक मराठा लाख मराठा व आरक्षण संदर्भात स्टेटस ठेऊन गळफास घेऊन जिवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना घडली होती ह्याची माहीती कळताच डॉ.ज्योतिताई विनायकराव मेटे यांनी आत्महत्या ग्रस्त कुटुंबास भेट देऊन सांत्वन केले व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असताना काही अडचण आल्यास मला सांगा असे शेवटी डॉ.ज्योतिताई मेटे यांनी सांगितले.











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.