बाळासाहेब मिसाळ पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार गट ) च्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उद्या नागरी सत्काराचे आयोजन
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील याच्या उपस्थितीत आष्टी तालुक्यातील हातोळण येथील बाळासाहेब मिसाळ पाटील यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थीत मुंबई प्रदेश कार्यालयात हा प्रवेश घेण्यात आला. बाळासाहेब मिसाळ हे गेली वीस बावीस वर्षापासून सामजिक चळवळीत काम करत होते. २०१४ पासून बहुजन मुक्ति पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते. २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वखाली लोकसभा आणि विधानसभेत अनेक उमेदवार उभे होते. पक्षाची राष्ट्रीय महासचिव या पदाची जबाबदारी त्यांनी काही काळ स्वीकारून गुजरात, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक तसेच तेलंगणा या राज्यात सुद्धा निवडणूक काळात काम केले होते. भाजप आरएसएस च्या कार्यकर्त्यां सारखे तळागाळात जावून काम करण्याची त्यांची हातोटी आहे. यामुळे बहुतांश काळ महाराष्ट्राबाहेर काम केल्यामुळे महाराष्ट्रात त्यांची विशेष ओळख नाही/नव्हती. गेली दोन वर्षापासून त्यांनी सक्रिय राजकारण सोडून गावामध्ये लक्ष दिले. त्यांनी गावात नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत स्वतःची २१ वर्षाची मुलगी जनतेतून सरपंच म्हणून निवडून आणली.
महाराष्ट्रातील त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी त्यांना सक्रिय भुमिका घेण्याची विनंती केली असता त्यांना राज्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पलामध्ये प्रवेश केला. या प्रसंगी त्यांच्या सोबत संतोष घरत, राजेंद्र इंगोले, शीतल खाडे, सत्यनारायण बिरादार, डॉ राजेंद्र कवठेकर, गणेश चौधरी, तुषार वाघ यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार, पवार, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महिला विभागीय अध्यक्षा भावना घाणेकर, हातोळण गावाच्या सरपंच भारती मिसाळ, जगन्नाथ वाघ, मनोहर वाघ याच्यासह अनेकांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पक्ष शेतकरी, कष्टकरी, शोषित, पीडित, सर्व अल्पसंख्याक बहुजन वर्गाला न्याय देणारा त्यांचे प्रश्न सोडवणारा पक्ष आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब हे प्रतिकूल परिस्थितीत पक्ष आणि विचार टिकवून आहेत. अश्या परिस्थितीत लोकशाही संपवनाऱ्या भाजपा सारख्या हुकूमशाही पक्षाचा पराभव करण्यासाठी आम्ही बहुजन मुक्ती पार्टी या पक्षाचा राजीनामा देवुन या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या निवडी बद्दल उद्या दि २७ रोजी हातोळण / औरंगपूर ग्रामस्थां तर्फे त्यांचे नागरी सत्काराचे आयोजन करण्यात येणार आहे . याप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे .
stay connected