आष्टी तालुक्यात उन्हाचा पारा वाढला नागरिकांनी काळजी घ्यावी

 आष्टी तालुक्यात उन्हाचा पारा वाढला नागरिकांनी काळजी घ्यावी 





आष्टी  (प्रतिनिधी)-तालुक्यात मागिल चार पाच दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून शहरातील कमाल तापमान हे ३८ ते ४० अंशापर्यंत गेले. सकाळी नऊ वाजेपासूनच उन्हाचा पारा वाढत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा चटका एवढा तीव्र होत असल्याने दुपारी आष्टीसह तालुक्यातील रस्ते नागरिकांअभावी ओस पडत आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्याने तालुक्यातील जनजीवनावर परिणाम होताना दिसत आहे. सकाळपासुन तापमान वाढू लागले दुपारी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे टोप्या, छत्र्या बाहेर आल्या आहेत. तर थंड पेयाच्या दुकानात नागरीकांची गर्दी वाढताना दिसत आहे. मागिल ४ दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. सुर्य आग ओकत असल्याने तापमानाची नोंद ३८ ते ४० अंश सेल्सिअस झाले आहे.

सकाळी ११ ते ४ वाजेच्या सुमारास त्याची तीव्रता वाढली असल्याने या काळात नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, महिला व पुरूषांनी घराबाहेर पडताना स्कार्फ, गमजा, टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. शक्यतो दुपारी ११ ते ४ या वेळेत कामाशिवाय बाहेर पडू नये, पुरेसे पाणी प्यावे, तहान लागली नाही तरी अर्धा अर्धा तासाने पाणी प्यावे, उन्हात कष्टाचे कामे टाळावीत, धुम्रपान करु नका, उच्च प्रथिन युक्त आहार, शिळे अन्न खाऊ नयेत, उष्माघातापासून सावधानता बाळगावी असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ प्रियंका सिंघण यांनी केले आहे.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.