कड्याच्या पहिल्या महिला सरपंच पारूबाई सांगळे यांचे निधन
———————
आष्टी : प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या कडा ग्रामपंचायतच्या पहिल्या महिला सरपंच पारूबाई दिनकरराव सांगळे (वय वर्ष 65) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन झाले.
दिवंगत पारूबाई सांगळे या कडा ग्रामपंचायतच्या 2002 साली आ.सुरेश धस यांच्या पार्टीकडून पहिल्या महिला सरपंच झाल्या होत्या. त्यांनी गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केल्याने महिला सरपंच ही पुरुषांपेक्षा कमी नाही हे दाखवून दिले होते. यामध्ये प्रामुख्याने कडा येथील पाणीपुरवठ्यासाठी देवी निमगाव तलावातून नवीन पाईपलाईन करणे ,शाळा खोल्याचे बांधकाम करणे, गावातील रस्ते ,गटारीचे कामे मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यावेळी केले होते. गेल्या काही दिवसापासून त्या अल्पशा आजाराने त्रस्त होत्या. त्यातच सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर राहत्याघराजवळ शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात संपत सांगळे, शंकर सांगळे ही दोन मुले तर सुना , नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीला आष्टी तालुक्यासह अनेक ठिकाणहून शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सामाजिक, वकील,डॉक्टर, पत्रकार मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.
stay connected