कडा येथील युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या
कडा/प्रतिनिधी.
आष्टी तालुक्यातील कडा येथील युवक सतीश विठ्ठल कोळपकर वय वर्ष 50 या युवकाने आपल्या राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. २६ मार्च रोजी सायंकाळी ६ : ३० वाजेच्या दरम्यान घडली या घटनेची माहिती कळताच कडा येथील पोलीस दूरक्षेत्र पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन गायकवाड व दीपक भोजे यांनी घटनास्थळी धाव घेतली . सतीश विठ्ठल कोळकर हा युवक मयत झाला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र कडा येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले .
आज दिनांक २७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले . सकाळी १० वाजता कडा येथील स्मशानभूमी सतीश विठ्ठल कोळकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .
सतीश विठ्ठल कोळपकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे सतीश विठ्ठल कोळपकर यांचे आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नसून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सचिन गायकवाड व हेड कॉन्स्टेबल दीपक भोजे हे करत आहेत.
stay connected