यशवंतराव चव्हाण यांची गांधी महाविद्यालयात जयंती उत्साहात साजरी
---------------------------------------
आष्टी/प्रतिनिधी
सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेले आणि आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने हिमालयाची उंची गाठलेले व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चव्हाण साहेबांनी आपल्या प्रगल्भ बुद्धीमत्तेच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर राज्याचे प्रथम मुख्यमंत्री ते केंद्रात संरक्षणमंत्रीपदापर्यंतचा केलेला प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीच्या चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या मार्गावरच आम्ही मार्गक्रमण करत आहोत. आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..
जयंतीनिमित्त अभिवादन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नंदकुमार राठी ,उपप्राचार्य डॉ ज मो भंडारी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे केंद्रसंयोजक प्राध्यापक डॉ अशोक कोरडे प्राध्यापक डॉ राधाकृष्ण जोशी ,प्राध्यापक डॉ सुनील पंढरे ,प्राध्यापक डॉ विष्णू गव्हाणे, प्राध्यापक डॉ तुकाराम गोंदकर, प्राध्यापक डॉ सुपर्णा देशमुख प्राध्यापक डॉ चंद्रशेखर तळेकर प्राध्यापक डॉ योगेश रसाळ, डॉ इनुस सय्यद, श्री पालवे सर ,तंत्र सहाय्यक श्री ज्ञानेश्वर खंदारेआणि महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते



stay connected