केवळ चूल आणि मूल हेच करण्यापेक्षा अन्य महत्वाच्या विषयावर एकत्र येणे ही महिलांसाठी काळाची गरज - प्राजक्ताताई धस आष्टी तालुक्यातील खडकत येथे जागतिक महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा जागर स्त्रीशक्तीचा कार्यक्रम संपन्न

 केवळ चूल आणि मूल हेच करण्यापेक्षा अन्य महत्वाच्या विषयावर एकत्र येणे ही महिलांसाठी काळाची गरज - प्राजक्ताताई धस 



आष्टी तालुक्यातील खडकत येथे जागतिक महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा जागर स्त्रीशक्तीचा कार्यक्रम संपन्न


आष्टी। प्रतिनिधी 

केवळ महिला दिनीच एकत्र न येता आठवड्यातून दोन वेळा तरी एकत्र येऊन विचार विनिमय रोजगार शिक्षण याबाबत महिलांनी चर्चा करणे व केवळ चूल आणि मूल हेच करण्यापेक्षा अन्य महत्वाच्या विषयावर एकत्र येणे ही महिलांसाठी काळाची गरज आहे आष्टी तालुक्यातील खडकत गावांमध्ये पहिल्यांदाच जागतिक दिन अनोख्या उपक्रम आणि प्रथमच साजरा होत आहे असे प्रतिपादन महानंदा दूध महासंघाच्या संचालिका प्राजक्ताताई धस यांनी केले त्या तालुक्यातील खडकत येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित खेळ पैठणीचा जागर स्त्रीशक्तीचा कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.


आष्टी तालुक्यातील खडकत येथे ११ मार्च रोजी महिलांसाठी खेळ पैठणीचा जागर स्त्रीशक्तीचा या कार्यक्रम आयोजित केला होता.सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सुलभा हंबर्डे,सायली हंबर्डे,आरती गिरी आदी व्यासपीठावर उपस्थित होत्या.पुढे बोलताना धस म्हणाल्या की ग्रामीण भागातील महिला देखील चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवू शकतात हे कार्यक्रम करत असताना आणखीही उपक्रम राबवून महिलांना एकत्र करून बचत गटाच्या माध्यमातून रोजगार मिळवण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. केवळ महिला दिनीच एकत्र न येता आठवड्यातून दोन वेळा तरी एकत्र येऊन विचार विनिमय, रोजगार,शिक्षण याबाबत चर्चा करणे गरजेचे आहे.केवळ चूल आणि मूल हेच करण्यापेक्षा अन्य महत्वाचे विषयावर एकत्र येणे ही महिलांसाठी काळाची गरज आहे. त्याचबरोबर स्वतःच्या आरोग्याकडे देखील लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले व खडकत गावी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे आणि आयोजकांचे कौतुक केले. यावेळी आरती गिरी व सायली हंबर्डे यांनी व्यासपीठावर आपले विचार मांडले यावेळी पुजा धोंडे यांनी देखील बचत गटाच्या आणि शासनाच्या योजनांची माहिती दिली या कार्यक्रमाचे तोरडमल सर व कु. ऐश्वर्या कोल्हे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. आयोजित केलेल्या खेळांमध्ये प्रथम क्रमांक रूपाली जेवे यांनी पटकावून मानाची पैठणी मिळवण्याचा बहुमान मिळवला द्वितीय क्रमांक ऐश्वर्या पवार व रूपाली जगताप यांनी विभागून पटकावला तसेच धनश्री मिसेन, मीना गांगर्डे,उषा जेवे,अनिता जेवे,भाग्यश्री जेवे,पुष्पा पवार, अर्चना पवार, शितल पवार,प्रिया जेवे,यांनीही पारितोषिके पटकावली तसेच कु. सिद्धी नवसरे, शिवानी नवसरे, ईश्वरी मगर,सृष्टी मगर,प्रांजल उदमले यांनीही पारितोषिके पटकावली या कार्यक्रमाचे सायली हंबर्डे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी शालन भोस्टे,रूपाली पवार,सविता काटे,उषा पवार,पूजा सोले,शारदा उदमले,उषा जगताप,समस्त महिला मंडळ आदींनी उत्कृष्ट नियोजन करुन परिश्रम घेतले.












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.