RATNAGIRI | मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या हस्ते दापोली उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, तसेच विविध विकास कामांचे भूमिपुजन पडले पार

 RATNAGIRI | मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या हस्ते दापोली उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, तसेच विविध विकास कामांचे भूमिपुजन पडले पार 



Ratnagiri - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दापोली येथील उपाजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांचे श्रेणीवर्धन करणे, श्री देव काळकाई मंदिर सभामंडप बांधकाम तसेच दापोली आणि मंडणगड येथील हॅब्रीड अन्युटी प्रकल्पांतर्गत रस्त्यांचे भुमिपुजन आज करण्यात आले.

काळकाई मंदिर सभामंडप बांधकामासाठी २ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांचा शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन करुन करण्यात आला. दापोली येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी २० कोटी २१ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. याही कामाचा शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन करुन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.



हायब्रीड अन्युटी (एमआरआयपी) अंतर्गत खेड व दापोली तालुक्यातील दापोली वाकवली साखरोली खेड भरणे रस्ता सुधारणा करण्याच्या कामास १३८ कोटी ६ लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. याचा शुभारंभही कोनशिलेचे उद्घाटन करुन शनिवारी करण्यात आला.












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.