बीड जिल्ह्यातील जलजिवन मिशन योजनेची चौकशी करा.अधिकार्यांनो TCS चा अहवाल पाहुन बीले काढु नका गावात येवुन प्रत्यक्ष पहा कीती नळजोडनी केली-आप संघटनमंत्री प्रदिप थोरवे

 बीड जिल्ह्यातील जलजिवन मिशन योजनेची चौकशी करा.अधिकार्यांनो TCS चा अहवाल पाहुन बीले काढु नका गावात येवुन प्रत्यक्ष पहा कीती नळजोडनी केली-आप संघटनमंत्री प्रदिप थोरवे



ईंजीनियर साहेब ज्या गावात एकही नळजोडनी नाही, त्या गावचे बिल ऊचलन्यासाठी बनवलेला TCS चा खोटा अहवाल दाखवताना लाज वाटुद्या, प्रत्यक्ष गावात येवुन दाखवा वर्क ऑर्डर प्रमाने कीती काम केले- प्रदिप थोरवे 


    बीड जिल्ह्यात पाण्यासाठीची वणवण भटकंती थांबावी, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने जलजिवन मिशन योजना राबवली जात आहे. जिल्ह्यातील गावांमधे या योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामधे  वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आल्या आहेत.तरी पाणीपुरवठ्यासाठी अशाप्रकारचा भरभक्कम शासकीय निधी वारंवार मिळनार नसल्यामुळे अंमलबजावणी यंत्रनेने सदर योजनेची उत्कृष्ट अमंलबजावणी करून एक आदर्श निर्माण करून इतर योजनांप्रमाणे या योजनेची दुर्गती होणे टाळले पाहिजे व शासकीय निधी सत्कारणी लागला पाहीजे, अशाप्रकारची मागनी आम आदमी पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री प्रदिप थोरवे यांनी बीड व आष्टी येथे कार्यकारी अभीयंता पाणीपुरवठा यांची भेट घेवुन केली आहे. भेटी दरम्यान अधीकार्यांनी तात्काळ मोबाईलवर TCS कंपनीच्या प्रतीनीधींकडुन फोटो धाखवुन तुमचे काम ओके आहे. असे सांगीतले परंतु प्रत्यक्षदर्शी
   सदर योजनेच्या निविदा प्रक्रियेत अधिकारी आणि गुत्तेदार यांनी संगनमताने मोठा घोटाळा केल्याचे दिसुन येत आहे. नातेवाईक आणि मर्जीतील गुत्तेदाराला निविदा मिळवून देताना नियम धाब्यावर बसवून प्रक्रिया केली आहे. यात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. 

      अनेक गावांमधे जलजीवन योजने अंतर्गत जुनीच विहीर खोलीकरण न करता, जुन्याच पाण्याच्या टाक्या दाखवून, निक्रुष्ट दर्जाचे लोकल कंपनीचे पाईप वापरुन  दीड फूट एवढीच जमीनीत पाईपलाईन गाढलेली आहे. एकही नळजोडनी न देता योजना फक्त कागदावर आहे . ईस्टीमेट प्रमाने काम न करता काम कागदावरच दाखवून बोगस बीले सुद्धा उचलली आहेत.
     ही अतीशय गंभीर बाब असुन या प्रकरणाची सखोल चौंकशी करून संबंधीत दोषी अधीकारी आणी गुत्तेदार यांच्यावर त्वरीत कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा सर्व ग्रामस्थांसमवेत आपल्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडन्यात येईल. असा ईशाराच प्रदिप थोरवे यांनी अधीकार्यांना दिला.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.