शरद पवार साहेबांनी संधी दिल्यास बीड लोकसभा निवडणूक लढवणार - प्रा. ईश्वर मुंडे

 

शरद पवार साहेबांनी संधी दिल्यास बीड लोकसभा निवडणूक लढवणार - प्रा. ईश्वर मुंडे




बीड : लोकसभेच्या आगामी निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, उमेदवारही निश्चित केले जात आहेत. महायुतीकडून विद्यमान खा. डॉ. प्रीतम  मुंडे यांच्या एकमेव नावाची चर्चा आहे, तर महाविकास आघाडीकडून दररोज नव्या चेहऱ्याचे नाव समोर येत आहे. आतापर्यंत तरी राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) माजी खा. जयसिंगराव गायकवाड, डॉ. नरेंद्र काळे, सुशीला मोराळे, प्रा. ईश्वर पंडित यांची नावे चर्चेत आली असून, सर्वच इच्छुक जिल्हाभरात गाठीभेटी घेताना दिसत आहेत .लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार ४०० पार अशी घोषणा केली होती. त्यापाठोपाठ  काँग्रेसकडूनही अशीच घोषणा करण्यात आली. शरद पवार साहेबांनी संधी दिल्यास बीड लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे प्रा. ईश्वर मुंडे यांनी जाहीर केले आहे .

 राज्यातही महायुती व आघाडीकडून जागा वाटपासाठी बंद दाराआड बैठका सुरू आहेत. सोबतच उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. आतापर्यंत तरी महायुतीकडून खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे. डॉ. मुंडे यांनी आतापर्यंत दोन वेळा विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळेच यावेळीही त्यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून अधिकृत अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही . प्रा. सुशिला मोराळे या चळवळीतील नेत्या आहेत. त्यांनीही दौरे सुरू केले आहेत. माजी खा. गायकवाड यांनीही काही दिवसांपूर्वी परळी तालुक्यात बैठक घेतली होती. परंतु, ते नंतर फारसे सक्रिय दिसले नाहीत.

*आठवडाभरात दौरा करणार : ईश्वर मुंडे*
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) राज्यप्रमुख प्रा. ईश्वर मुंडे यांनी मंगळवारी बीडमधील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. मला खा. शरद पवार यांनी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे बीड जिल्हाध्यक्षांना सांगून आपण तयारी सुरू केली आहे, आठवडाभरात आम्ही मिळून जिल्हाभरात दौरा करणार आहोत. पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढवू आणि जिंकूनही दाखवू, असा विश्वासही प्रा. मुंडे यांनी व्यक्त केला.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.