ICICI Foundation कडून शाळेला मिळाले Solar panel

 ICICI Foundation कडून शाळेला मिळाले Solar panel 



लोणी प्रतिनिधी:


      आयसीआयसीआय फाउंडेशन व आयसीआयसीआय लोबर्डच्या वतीने लोणी सय्यदमीर येथील सय्यदमीर बाबा विद्यालयाला सोलर युनिट देण्यात आले. यामध्ये जिल्हा विकास अधिकारी चेतन पाटोळे साहेब तसेच तालुका समन्वयक कांबळे साहेब यांनी मोलाची कामगिरी बजावली व शाळेसाठी सोलर युनिट उपलब्ध करून दिले.

     शाळेमध्ये विजेचा गंभीर प्रश्न लक्षात घेता हे सोलर युनिट शाळेला फाउंडेशन मार्फत देण्यात आले. यामुळे शाळेमध्ये विविध सुखसुविधा विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. शाळेमध्ये विद्युत दिव्यांची लागण होईल. तसेच वर्गामध्ये पंखेसुध्दा चालणार आहेत. संगणक चालवण्यासाठी तसेच विविध उपकरणांसाठी या सोलर युनिटचा चांगला उपयोग होणार आहे. सोलर युनिट ही काळाची गरज झाली आहे त्यामुळे याचा भरपूर फायदा होणार आहे. सोलर युनिट बसवल्यामुळे विद्यालयातील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आयसीआयसीआय फाउंडेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांचे विद्यालयाच्या वतीने आभार मानण्यात आले.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.