संत रोहिदास महाराजांनी कविताच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे महान कार्य केले : सागर धस
आष्टी : प्रतिनिधी
संत रोहिदास महाराज यांनी आपले जीवन जगत असताना कविताच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे महान कार्य केले असल्याचे प्रतिपादन युवानेते सागर धस यांनी केले.
ते आष्टी तालुक्यातील कडा येथील चर्मकार समाज बांधवासाठी आ. सुरेश धस याच्या आमदार फंडातून उभारलेल्या समाज भवनाच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना सागर धस म्हणाले की, आमदार सुरेश आण्णा धस यांनी प्रत्येक समाजासाठी तालुक्यामध्ये सामाजिक सभागृह दिले आहेत. कडा येथे हे आता संत रोहिदास यांच्या नावाने सभागृह देऊन सामाजिक समतोल ठेवण्याचे काम केले आहे. आमदार धस यांनी समाजातील छोट्या मोठ्या घटकांना नेहमीच न्याय देण्याचे प्रामाणिकपणे काम केले आहे. त्याचप्रमाणे आता चर्मकार समाजासाठी कड्यांमध्ये अत्याधुनिक असे सामाजिक सभागृह बांधल्याने या ठिकाणी समाजासाठी विविध कार्यक्रम घेता येणार आहेत. याचा उपयोग करण्याचे आवाहन सागर धस यांनी केले
यावेळी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी,माजी सभापती संजय ढोबळे, सरपंच युवराज पाटील, उपसरपंच बाळासाहेब कर्डीले,माजी सरपंच संपत सांगळे,चेअरमन उध्दव कर्डीले, अनिल ढोबळे,सागर खेडकर, विष्णू कुसळकर, प्रकाश खेडकर, छगन कर्डिले,जयंत खंदारे, याच्यासह चर्मकार समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन माजी सरपंच अनिल ढोबळे तर उपस्थिताचे आभार ग्रामपंचायत सदस्य जयंत खंदारे यांनी मानले.


stay connected