अरणविहिरा- तागडखेल- जोमदरा तांडा ग्रामपंचायतच्या केलेल्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करा.
ग्रा.पं.सदस्यांची गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार
आष्टी। प्रतिनिधी तालुक्यातील सरहदीवर अरणविहिरा तागडखेल जोमदार तांडा ही ग्रुप ग्रामपंचायतीने जानेवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये विविध विकास कामे करण्यात आली आहेत या कामांमध्ये अनियमितता झाली असून काही ठिकाणी जागेचे दानपत्र घेण्यात आलेले नाही फक्त थातुरमातुर पद्धतीने कामे करण्यात आली आहेत सरपंच ग्रामसेवक यांनी संगनमताने गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्यांना विचारात न घेता निकृष्ट पद्धतीने कामे केली आहेत या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे आसमा शौकत पठाण,ज्योती नरेंद्र गव्हाणे,निलेश सुभाष चव्हाण आदी ग्रामपंचायत सदस्यांनी दि २२ फेब्रुवारी रोजी केली आहे. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की जोमदरा तांडा अंगणवाडी हौद बांधकाम, शाळा डिजिटल करणे,अंगणवाडी शौचालय उभारणे, अरणविहिरा जिल्हा परिषद शाळेत रंगरंगोटी करणे,अरणविहिरा येथे स्मशानभूमी जाळी मारणे, अरणविहीरा गावातील स्वजलधारा विहीर ते पाण्याची टाकी पाईपलाईन करणे,तागडखेल गावांमध्ये पाण्याची टाकी बांधणे,तागडखेल गावातील अंगणवाडी रंगरंगोटी करणे,यासह अनेक कामे करण्यात आलेली आहेत काही ठिकाणी जागेचे दानपत्र घेण्यात आलेले नाही तसेच फक्त थातुरमातुर पद्धतीने कामे करण्यात आलेले आहेत अनेक कामे अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात आले नसून सरपंच ग्रामसेवक यांनी संगम मताने गावातील ग्रामस्थ सदस्य यांना विचारात न घेता मनमानी अर्धवट कामे निकृष्ट पद्धतीने करून शासकीय रकमेचा मोठा अपहार केला आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी कोणीच अभियंता अद्याप गावात फिरकलेला नाही याचा जाब संबंधितांनी ग्रामस्थांनी विचारला असता ग्रामस्थांना आरेरावीची भाषा वापरण्यात येत आहे अनेक बोगस केलेल्या कामाची देखील बीले उचलण्याची तयारी संबंधितांनी केली आहे.तरी ग्रामपंचायत कालावधीत केलेल्या कामाची चौकशी करून कामाची चौकशी होत नाही तोपर्यंत देयके अदा करू नयेत देयके अदा केलेली निदर्शनास आल्यास आम्ही सर्व ग्रामस्थ आंदोलन करू असा इशारा दिला आहे.या निवेदनावरती सचिन शिरसाठ,शौकत पठाण,सचिन गव्हाणे, नरेंद्र गव्हाणे, निलेश चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


stay connected