कुंभारवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहास उद्यापासुन प्रारंभ

 कुंभारवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहास उद्यापासुन प्रारंभ

Baludev Maharaj


आष्टी तालुक्यातील कुंभारवाडी येथे संत बाळुदेव महाराज यांच्या स्मृती पित्यर्थ (शनिवार दि २४ ) उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळाची सुरुवात होत आहे . या सोहळ्या निमीत्त शनिवार दि . २४ रोजी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत हभप वाघ महाराज यांचे प्रवचन व रात्री ९ वाजता हभप ज्ञानेश्वर महाराज जांभळे यांचे किर्तन होणार आहे . रविवार दि . २५ रोजी हभप गाडे महाराज यांचे प्रवचन तर हभप संग्राम बापू भंडारे यांचे किर्तन होईल सोमवार दि २६ रोजी हभप पुष्पाताई जगताप यांचे प्रवचन तर हभप योगीता ताई देवकर यांचे किर्तन होईल . मंगळवार दि २७ रोजी हभप अंकुश महाराज कर्डिले यांचे प्रवचन तर हभप कबीर महाराज आतार यांचे किर्तन होईल .बुधवार दि . २८ रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज थोरवे यांचे प्रवचन तर हभप विशाल महाराज खोले यांचे किर्तन होईल . गुरुवार दि . २९ रोजी हभप रविंद्र नित्यानंद प्रभू यांचे प्रवचन तर हभप अक्रुर महाराज साखरे यांचे किर्तन होईल शुक्रवार दि . १ मार्च रोजी ग्रंथ दिंडी मिरवणूक व त्यानंतर हभप उध्दव महाराज चोले यांचे किर्तन होईल . शनिवार दि २ मार्च रोजी सकाळी १० ते १२ हभप माऊली महाराज खडकवाडी कर यांचे काल्याचे किर्तन होईल . त्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल . या सर्व कार्यक्रमाचा लाभ कुंभारवाडी व परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सप्ताह कमेटी व कुंभारवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे .









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.