आईसाहेब हाॅटेल मध्ये शिवजयंती निमित्त गुळाचा चहा मोफत
कडा ( अनिल मोरे ) :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने कडा येथील आईसाहेब हाॅटेल मध्ये गुळाचा चहा मोफत वाटप करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यात व राज्याच्या बाहेरही विविध सामाजिक उपक्रमाने साजरी केली जाते. कडा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकामधील आईसाहेब हाॅटेल मध्ये आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी दिवसभर गुळाच्या चहाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती हाटेलचे मालक
प्रविण बहिर, संतोष मोटे यांनी दिली. आरोग्यदायी असणाऱ्या गुळाच्या चहाचा शिवप्रेमी व ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रविण बहीर व संतोष मोटे पाटील यांनी केले.


stay connected