नापास विद्यार्थ्यांनीही जगात क्रांती केली आहे -डाॅ. विठ्ठल जाधव रेणूका विद्यालयात मुलांचा अभिष्टचिंतन सोहळा

 नापास विद्यार्थ्यांनीही जगात क्रांती केली आहे -डाॅ. विठ्ठल जाधव 
रेणूका विद्यालयात मुलांचा अभिष्टचिंतन सोहळा 








शिरूरकासार: दि.१७

       आयुष्यात कष्टाशिवाय पर्याय नाही. कुठेही जा कष्ट केले तरच यशस्वी व्हाल. सातत्यपूर्ण कार्याने जीवनात यश प्राप्त होते. नापास विद्यार्थ्यांनीही जगात क्रांती केलेली आहे असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव यांनी मानूर येथे दि.१६ रोजी रेणूका विद्यालयात अभिष्टचिंतन समारंभ प्रसंगी बोलताना केले. यावेळी  अध्यक्षस्थानी प्राचार्य एन.एस. काळे हे होते. तर प्रा. लक्ष्मण तांदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

        मानूर येथील रेणूका विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अभिष्टचिंतन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव यांनी विद्यार्थ्यांना अपयशाने खचू नका आणि यशाने हुरळून जाऊ नका. सातत्यपूर्ण कष्ट करा यश तुमचेच आहे. नापास विद्यार्थ्यांनीही जगात क्रांती केली आहे. आईबापाचे कष्ट विसरू नयेत. आत्महत्या होतात हे दुर्दैव आहे. गैरमार्ग पत्करू नये असे सांगत माय आणि माती, नवा फटका, अटर का पटर या कविता पेश केल्या. विद्यार्थ्यांनी त्यास उत्स्फूर्त दाद दिली. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. दहावी वर्गास यावेळी निरोप देण्यात आला. यावेळी एन. के. पाखरे, जी. व्ही. गायकवाड, ए.एम.खामकर, पेशकार, विशाल जायभाये, बनसोडे, खेडकर, काकडे, जेधे, ए.एस.पानसरे आदी शिक्षक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अश्विनी सिरसाट यांनी तर शिफा सय्यद यांनी आभार मानले.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.