सालेवडगाव - दौलावडगाव शिवावरील अनाधिकृत खडी क्रेशर बंद करा - शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे तक्रार

 सालेवडगाव - दौलावडगाव शिवावरील अनाधिकृत खडी क्रेशर बंद करा - शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे तक्रार



 आष्टी तालुक्यातील सालेवडगांव, दौलावडगांव शीव रस्त्यावर गेल्या दोन वर्षापासुन अहमदनगर येथील व्यक्तीने अनाधिकृतपणे खडी क्रशर चालवले आहे. त्यामुळे क्रशरच्या बाजुच्या अर्धा की.मी. अंतरावरील बागायत शेती पडकास टाकण्याची वेळ आलेली आहे. या पुर्वीपण शेतकऱ्यांनी संबंधीत खात्यास कळवले होते परंतु त्याची कोणीही दखल घेण्यात आली नाही. शेतकऱ्यांनी समक्ष त्या व्यक्तीला अनेक वेळा क्रशरवर जावुन याविषयी विनंती केली परंतु तो आणी त्यांची माणसे दादागीरीची भाषा वापरतात व तेथून हाकलुन लावतात खडी मशीनचा ऐवढा फुफाटा (धुळ) उडते की त्यामुळे शेतात कोणतेच पीक येत नाही. शेतात कामपण करता येत नाही. तसेच शेतमजुर तर तेथे थांबतच नाहीत. त्यामुळे कमीत कमी 100 ते 150 एकर जमीन कसता येत नाही. काही स्थानीक मंडळींना हाताशी धरुन क्रशर चोवीस तास चालू आहे. परवाना नसतांना लाईट बोर्डाने त्यांना एक्सप्रेस फीडरची लाईट दिलेली आहे. त्यामुळे क्रशर कधीही बंद नसते त्यामुळे या भागातील शेतकर्यांना शेतात जाता येत नाही. आणी पीकाची लागण पण करता येत नाही.

याबाबत दौलावडगावचे उपसरपंच नंदकुमार फसले व पिडीत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन दिले असून शेतकऱ्यांनी त्यांना विनंती केली आहे की, आपण ताबडतोब या क्रशरची चौकशी करुन ते बंद करण्यात यावे आणि आम्हा शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा नाहीतर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, तरी येत्या 15 दिवसात चौकशी करुन क्रशर बंद करण्यात यावे अन्यथा हीच शेवटची नोटीस समजुन आम्ही सार्वजनिक आत्महत्या करणार आहोत. त्यानंतर काय होईल याला आपण सर्वस्वी जबाबदार राहणार याची नोंद घ्यावी.

आम्ही इतर क्रेशर धारकापाशी चौकशी केली असता 20 ते 25 प्रकारचे  परवाने घ्यावी लागते असे समजले याने मात्र कुठलाही परवाना घेतलेला नाही, अशी माहिती मिळते क्रशर मोठ्या साईजचे असल्यामुळे दोन वर्षांत मोठ-मोठ्या खदाणी तयार झालेल्या आहेत. परंतु खदाण परवाना नाही त्यामुळे शासनाकडे गौनखनिज भरणासुद्धा करत नाही. अर्थात हे सर्व संबंधीत खात्याला माहित आहे परंतु कोणीही दखल घेत नाही . असे जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या निवेदनात अर्जदार नंदकुमार रामदास फसले उपसरपंच दौलावडगाव आणी इतर पीडीत शेतकरी दौलावडगांव व सालेवडगांव यांनी म्हटले आहे .









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.