विविध मागण्यांसाठी वंचीत बहुजन आघाडीचा आष्टी तहसिलवर धडकला आक्रोश मोर्चा

 विविध मागण्यांसाठी वंचीत बहुजन आघाडीचा आष्टी तहसिलवर धडकला आक्रोश मोर्चा



_______________________

संदिप जाधव/आष्टी

तालुक्यातील कडा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा रस्त्याच्या मध्यभागी उभारण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी मंगळवार दिनांक २० रोजी आष्टी तहसिलवर वंचित बहुजन आघाडीचा आक्रोश मोर्चा धडकला.

याविषयी अधिक माहिती अशी की,साबलखेड ते आष्टी या सतरा किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कामाला गेल्या वर्षभरापासून सुरूवात झाली आहे.

ते काम आता अंतिम टप्प्यात आले असल्याने कडा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतषळ्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला असल्याने समस्त भिमसैनिक आक्रमक झाले आहेत.

महामार्गाचे अभियंता राजेंद्र भोपळे यांना याबाबत विचारणा केली असता डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मध्यभागी घेण्यासाठी आपल्याला परवानगी नसल्याचे ते बोलत आहेत.

त्यामुळे तालुक्यातील सर्व भिमसैनिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले आहे.

त्याचबरोबर ज्ञानराधा मल्टीस्टेट तिरुमला ऑईलची प्रोपर्टी जप्त करून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत कराव्यात.

 कसत असलेल्या गायरान धारकांना त्यांच्या जमीनी नावे कराव्यात.

भिल्ल,पारधी व भटक्या समाजातील सर्व प्रलंबीत खटले निकाली काढावेत व त्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत.

अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले आहे. या मोर्चाला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सचिन मेकडंबर,पोटोदा तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, जेष्ठ नेते गोरख झेंड, वंचित बहुजन आघाडीचे नेते राहुल जाधव,ठकाराम दुधावडे, सुनिल जाधव,सोनू जाधव, स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष दिपक गरुड, बाळासाहेब गायकवाड, अविनाश जाधव, अविनाश घोडके,रुपेश बोराडे, अशोक निकाळजे,बंटी घोडके,काका घोडके,विशाल घोडके,कांबळे सह आदी सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.