53 वर्षापासुन जोपासली बहुरुपीची परंपरा.
कडा /प्रतिनिधी. अनिल मोरे -
जामखेड तालुक्यातील भवरवाडी येथील रहिवासी असलेले बहुरूपी सुभाष शिंदे यांची कहाणी वडिलोपार्जित आपली कला जोपासली.
बहुरुपी म्हटले की आपल्या समोर खाकी काळा गॉगल,काळ बुट असा असलेला पोशाख उभा राहतो .
बहुरुपी आपली कला दाखवत अनेक मनोरंजन करतात .
जुन्या काळी हे बहुरुपी मोठ्या प्रमाणात आपली कला सादर करत असत व आपला उदर निर्वाह चालवत असे परंतु आज त्या बहुरूपी समाजाचा समाजाने खेळ मांडला आहे .
पहील्या काळामध्ये बहुरुपी समाजाला मोठ्या प्रमाणात किंमत होती बहुरुपी दारात आला तर तो आपली कला दाखवुन लोकांच्या चेहर्यावर एकप्रकारे हास्य दाखवत होते .शासनाने या बहुरुपी समाजाला कसल्याही प्रकारचा लाभ मिळत नाही .
शासकीय लाभापासून हा बहुरुपी समाज वंचित राहीला आहे तरी ह्या बहुरुपी समाजाला काहीतरी शासकीय लाभ देण्यात यावा अशी विनंती याबहुरुपी समाजाने केली आहे.


stay connected