आष्टी तालुक्यासाठी खुप अभिमानाचा क्षण : बाबासाहेब पिसोरे, यांना कृषी क्षेत्रातील सर्वोच्च असा डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर

 आष्टी तालुक्यासाठी खुप अभिमानाचा क्षण : बाबासाहेब पिसोरे, यांना कृषी क्षेत्रातील सर्वोच्च असा डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर

Babasaheb Pisore


आष्टी तालुक्यासाठी खुप अभिमानाची बातमी आहे .प्रगतशील प्रयोगशिल व शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व असलेले बाबासाहेब नानाभाऊ पिसोरे, रा. दौलावडगाव यांना कृषी क्षेत्रातील सर्वोच्च असा डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार 2021  जाहीर झाला आहे . संपुर्ण महाराष्ट्रातून या पुरस्कारासाठी दरवर्षी केवळ एकाच व्यक्तीची निवड होत असते . हा पुरस्कार कृषी क्षेत्रातील अमुल्य भरीव कामगिरी बद्दल महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतो . बाबासाहेब पिसोरे यांच्या कृषी क्षेत्रातील अनमोल योगदानाची दखल घेत आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत . मात्र कृषी क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना जाहीर झाल्यामुळे आष्टी तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे  .  त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री तसेच आयुक्त , कृषी आयुक्त , कृषी सचिव , बीड जिल्हा कृषी अधिक्षक जेजुरकर साहेब , तालुका कृषी अधिकारी गोरक तरटे साहेब तसेच आमदार सुरेश धस , आमदार बाळासाहेब आजबे , माजी आमदार भिमराव धोंडे , माजी आमदार साहेबराव दरेकर , तसेच आष्टी तालुक्यातील सर्व अधिकारी , पदाधिकारी व विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी बाबासाहेब पिसोरे यांचे अभिनंदन केले आहे . तसेच आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील श्रीमती विजया गंगाधर घुले,  यांना जिजामाता कृषिभूषण शेतकरी 2021 महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर झालेला आहे. तसेच राजू भाऊसाहेब सुपेकर आष्टीचे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी यांना पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुरस्कार प्राप्त तीनही व्यक्तीचे कृषी क्षेत्रातील काम शेतकऱ्यांना योग्य दिशा देणारे आहे. या सर्व गुणवंत पुरस्कार प्राप्त सन्मानार्थीचे तेजवार्ता न्यूज नेटवर्क तर्फे खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा .








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.