AMRAVATI | पेपरफुटी प्रकरणावर विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप, विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर केली निदर्शने

 AMRAVATI | पेपरफुटी प्रकरणावर विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप, विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर केली निदर्शने



अमरावती प्रतिनिधी - अमरावती शहरातील ड्रीम लँड येथील एआरएन असोसिएट या परीक्षा केंद्रावर पेपरफुटीचा प्रकार घडला. या आधी येथे परीक्षेच्या आयोजनाला घेऊन अनेकदा गोंधळ उडाला होता. 21 फेब्रुवारी रोजी ड्रीम लँड सेंटरवर मृदा व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी पदाच्या भरतीत पेपर घोटाळा झाला. कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यानेच काही विद्यार्थ्यांना उत्तरे हॉल तिकीट वर प्रिंटेड स्वरूपात पुरविल्याचे समोर आले होते. पेपर फुटल्याचे लक्षात येतात विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर एकच संताप व्यक्त करून गोंधळ घातला होता. आज विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून ही परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना केली आहे. काही वेळानंतरच राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये आले असताना खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या गाडीला संतप्त विद्यार्थ्यांनी घेतला घेराव. घेराव घेतल्यानंतर डॉ. बोंडे यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना याप्रकरणी लक्ष देण्याची विनंती केली आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.