भोपळेंनी दाखल केलेल्या 353 च्या केसमध्ये सञ न्यायालयाने मंजुर केला अटकपुर्व जामीन.
कडा/प्रतिनिधी.
आष्टी तालुक्यातील कडा येथील जमीन अर्जदाराच्या मालकी कब्जेहक्काची असुन अहमदनगर-चिंचोडी-पाटील-साबलखेड-धानोरा-कडा-आष्टी-जामखेड पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्र 561 साठी संपादीत होत आहे. शेतकरी मावेजाची कायदेशीर मागणी कायदेशीर मार्गाने करीत आहेत. परंतु, भोपळेंना आणि गुत्तेदारांना शेतक-यांचे काही देणे घेणे नाही. शेतक-यांवर दबाव आणण्यासाठी इंजिनियर भोपळेंनी कडा येथील जमीन मालकांवर दाखल केलेल्या भादवि कलम 353 च्या केस मध्ये मा. सञ न्यायाधिश बीड श्री. केदार जोगळेकर यांनी अंतरीम अटकपुर्व अर्ज मंजुर करून संबंधीत शेतकरी अर्जदारांवर पुढील आदेशापर्यंत आष्टी पोलीसांनी कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.
दिनांक 30-01-2024 रोजी कडा येथील शेतक-यांनी श्री. भोपळे व पोलीस निरीक्षक खेतमाळस यांच्या ञासाला कंटाळुन आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याचा राग धरून आणि जमीन मालकांची जमीन फुकटात लाटण्यासाठी गरीब लोकांवर खोटया केसेसच्या माध्यमातुन दबाव आणुन काम करण्यासाठी श्री. भोपळे यांनी दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी आष्टी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती. त्यामध्ये लोकांनी कसलाही गुन्हा केलेला नसतांनाही लोकांवर खोटया केलेस केल्या. त्यामुळे अर्जदार पांडुरंग कर्डिले व इतरांनी मा. सञ न्यायालय बीड येथे अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यामध्ये मा. न्यायमुर्ती श्री. केदार जोगळेकर यांनी अंतरीम अटकपुर्व जामीन मंजुर करून पोलीसांना असा आदेश दिला आहे की, पुढील आदेशापर्यंत संबंधीत अर्जदाराविरूध्द पोलीसांनी कसलीही अनुचीत कारवाई करू नये. या निकालामुळे कडा येथील गरीब लोकांचा कायदयावरील विश्वास वाढला आहे. कारण प्रशासनाच्या दहशतीमुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. परंतु. न्यायालयाच्या आदेशामुळे पोलीस व श्री. भोपळेंची दहशतीला आळा बसला आहे. या प्रकरणात शेतकरी अर्जदारांच्या वतीने ॲङ बाळासाहेब बोडखे यांनी काम पाहीले. त्यांना ॲङ नितीन बोडखे यांनी सहकार्य केले.


stay connected