JALGAON | शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सरकारने न्याय न दिल्यास, शेतकरी पेटून उठेल - एस बी पाटील

 JALGAON | शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सरकारने न्याय न दिल्यास, शेतकरी पेटून उठेल -  एस बी पाटील



 : स्वामीनाथन चरण सिंग यांना भारतरत्न दिल्याने शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही त्यांचे विचार त्यांनी जे काही लिहून ठेवलेल आहे ते शेतकऱ्यांसाठी देण्याचे भूमिका जोपर्यंत सरकार घेत नाही तोपर्यंत भारतरत्न देऊन शेतकऱ्यांना फायदा होत नाही. शेतकऱ्यांना लुटणं ज्या दिवशी सरकार बंद करेल त्या दिवशी भारत हा सुजलाम सुफलाम होईल. 


गेल्या वर्षी देखील शेतकऱ्यांनी अतिशय शांतपणाने आंदोलन केले कोणालाही त्रास होईल असं कोणी वागलं नाही. एवढ्या मोठ्या काळापर्यंत आंदोलन केलं या मागणीसाठी आज सरकार म्हणतंय 80 कोटी जनतेला फुकट अन्नधान्य देतो ज्यांना फुकट देता आहात ते कोणाच्या जीवावर. शेतकऱ्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा पर्याय हवा असताना चीनच्या बॉर्डर उघड्या आहेत पण शेतकऱ्यांसाठी बघितलं तर जगामध्ये असं कोणत्या देशामध्ये नसेल एवढ्या शांततेच्या मार्गाच्या आंदोलनाला त्रास दिला जातो आहे. देशातील शेतकरी पुन्हा पेटून उठेल राजकारण्यांनी ते दडपण्याच प्रयत्न न करता सरकारने चर्चेच्या माध्यमातून न्याय भूमिका घेऊन त्यांच्या हक्काचं त्यांना द्यावं एवढी शेतकऱ्यांकडून त्यांना अपेक्षा आहे शेतकरी नेते एस बी पाटील. 








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.