SANGLI | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांची विशेष मोहीम

 SANGLI | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांची विशेष मोहीम





सांगली जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत २०२३ या वर्षात खून, चेन स्नॅचिंग, अत्याचारांच्या घटनेत वाढ झाल्याचे चित्र आहे.  तर दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसह गंभीर गुन्ह्यात घट झाली आहे. अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले असून दाखल गुन्ह्यांच्या निर्गतीकरणाकडे आमचे लक्ष असेल अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली. अधीक्षक तेली यांनी साल २०२३ चा आढावा यावेळी मांडला. 


डॉ. तेली म्हणाले, गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०२३ साली एकूण खुनाचे गुन्हे हे ६९ दाखल झाले आहेत. हे सर्व गुन्हे उघडकीस आणून संशयितांना जेरबंद देखील केले आहे. यामध्ये वैयक्तिक कारणातून सात खून, राजकीय एक, प्रेम संबंधातून नऊ, रोड रेंज एक, कौटुंबिक वादातून ११, जमीन वादातून १० यांसह अन्य कारणांचा समावेश आहे. २०२३ साली विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे जास्तीत -जास्त उघडकीस आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. जे आरोपी पोलीस रेकॉर्डवर परागंदा आहेत त्यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.