हप्ता मिळेणा; घरकुल पुर्ण होवून सहा महिने लोटले
कडा /प्रतिनिधी...
आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील महिलेचे घरकुलाचे काम पुर्ण होवून सहा महिन्याचा कालावधी लोटला आहे. महिला वृद्ध असल्यामुळे तीला आष्टीला येता येत नाही. आष्टीला येणाऱ्या प्रत्येकाला सांगतात की, माझा घरकुलाचा शेवटचा हप्ताच मिळाला नाही तेवढ बघा..
पाटण सांगवी येथील सरूबाई कचरू खंडागळे या महिलेला पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल मंजुर झाले होते. यामध्ये सरूबाई खंडागळे यांना आतापर्यंत
१ लक्ष १५ हजार रूपयेच प्राप्त झाले आहेत. त्यांना बीड जिल्हा कलेक्टर दीपा मुधोळ यांच्या हस्ते आष्टी मध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये प्रमाणपत्र देखील देले गेले आहे. आता त्यांना उर्वरित पैसे मिळत नसल्याने त्या व्यथित झाल्या आहेत. सरूबाई खंडागळे यांचे वय ८५ वर्षाच्या आसपास आहे. त्यांना बांधकाम कामगारांना पैसे देणे आहेत. याच चिंतेत त्या सतत असतात. कलेक्टर यांनी मला सर्टीपिकेट दिले आहे मग पैसे कसेकाय मिळत नाहीत? असा प्रश्नही त्या विचारतात. पंचायत
समिती मध्ये सतत विचारपुस केली की ते म्हणतात अजुन मस्टर भरायला चालु झाले नाही. झाल्यावर पैसे पडतील. ज्या घरकुल धारकांकडे शौचालये नाहीत त्यांना काम पूर्ण म्हणून संपूर्ण हप्ते आज पर्यंत मिळालेच आहेत? शौचालये नसलेली असंख्य घरकुले जिल्हापरिषदेने सर्व्हे केला तर सहज सापडतील. पण घराचे संपुर्ण काम करूनही पैसे मिळाले नाही असे उदाहरणे सुद्धा आता समोर यायला लागली आहेत. सिईओ पाठक साहेब लक्ष देणे गरजेचे आहे.
stay connected