आता Narendra Modi ची नजर शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर ; शेतकरी येणार Income Tax च्या कक्षेत
शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावर कोणताही आयकर घेतला जात नाही. परंतु मोदी सरकार यामध्ये लवकरच बदल करण्याची शक्यता आहे. शेतीतून मिळणारे उत्पन्न आयकराच्या कक्षेत येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी यावर चर्चा सुरू झाली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच RBI MPC च्या चलनविषयक धोरण समितीच्या सदस्य आशिमा गोयल यांनी कृषी उत्पन्नावरील आयकराची बाजू मांडली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आरबीआय एमपीसी सदस्य गोयल यांनी देशातील श्रीमंत शेतकऱ्यांवर आयकर लादण्याची भूमिका मांडली आहे. यामुळे करप्रणालीत निष्पक्षता येईल, असे गोयल यांचे म्हणणे आहे.
आशिमा गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार गरीब शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसानच्या माध्यमातून अनुदान देत आहे. याचीच भरपाई करण्यासाठी सरकार श्रीमंत शेतकऱ्यांवर आयकर लावू शकते. यामुळे करप्रणालीत निष्पक्षता येईल असे गोयल यांचे मत आहे.देशात एकूण ३ टक्के शेतकरी श्रीमंत आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना अनेक योजनांच्या माध्यामातून सरकारकडून मदत दिली जात आहे. त्यामुळे केवळ अधिक कमाई करणाऱ्या शेतकऱ्यांनाच आयकर लागू करण्याचा सरकारचा विचार असल्याचेही गोयल यांनी म्हटले आहे.यासोबतच गोयल म्हणाल्या की, एक हाती सत्ता असलेले सरकार असे कायदे करू शकते परंतु विरोधकांचीही बाजू ऐकून घेणे महत्वाचे आहे. उत्पादनक्षमता वाढवणाऱ्या नावीन्यपूर्ण गोष्टींना चालना मिळाली तर भारत श्रीमंत होऊ शकतो. यासाठी विवेकपूर्ण नियमांद्वारे संरक्षित वैयक्तिक स्वातंत्र्य आणि क्षमतांची सुव्यवस्थित सरकारी सुविधा आवश्यक आहे.
पीएम किसान योजनेंतर्गत देशातील कोट्यवधी गरीब शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारकडून पैसे हस्तांतरित केले जातात. ही योजना डिसेंबर २०१८ मध्ये सुरू झाली. याअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये पाठवले जातात. ही रक्कम प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये डीबीटीद्वारे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.

%20(22).jpeg)
stay connected