कडा शहरात खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन..!

 कडा शहरात खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन..!



आष्टी/प्रतिनिधी

श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ,न्यु फ्रेन्ड क्रिकेट क्लब आणि जयहिंद क्रिकेट क्लब आयोजित भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कडा शहरात करण्यात आले आहे.


सध्या नवयुवक मोबाईलमध्ये गुंतला आहे.या मोबाईलमुळे नवतरूण मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करत आहेत.परंतु मैदानी खेळ खेळल्याने नक्कीच फायदा होतो.

या खेळाने शरीर धष्टपुष्ट होऊन निरोगी राहते.तरी नवयुवकांनी खेळाकडे वळावे अशी माहिती माजी सरपंच अनिल ढोबळे यांनी तेजवार्ताशी बोलताना दिली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन आज दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले.

यावेळी श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष योगेशशेठ भंडारी, सभापती रमजानशेट तांबोळी,माजी सरपंच अनिल तात्या ढोबळे,प्रा डॉ मुस्ताक पानसरे,बापीनशेट भंडारी, उपसरपंच बाळासाहेब कर्डीले,प्रा जमीर सय्यद सर,संजय ढोबळे,चंकीशेट चाणोदिया,संजय मेहेर,जयंत खंदारे, गोविंद मिश्रा,बंडु ढोबळे, दिपक भैय्या गरुड, पत्रकार रघूनाथ कर्डिले, इब्राहिम सय्यद,किरण काळे,शेखर कर्डिले, बाळासाहेब घोडके, सुनिल जाधव, सुखदेव खोटे, श्रीनिवास खंदारे,आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेचे प्रथम बक्षीस ३१००० हजार रुपये,व्दुतीय बक्षीस २१००० हजार रुपये, तृतीय बक्षीस २१००० हजार रुपये आणि चतुर्थ बक्षीस ११००० हजार रुपये अशा प्रकारे बक्षीसांचे आयोजन करण्यात आले आहेत.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बाबु तारु,समद पानसरे,रवि गांजुरे,अनिल घोडके,दिपक कदम,जाबीर सय्यद,जावेद दाजी,नासीर पानसरे,तालिब सय्यद,वसिम पानसरे,लखन सय्यद,फकिर सय्यद,विलास शिरोळे,आदी परिश्रम घेत आहेत.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.