ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेचा कडा शाखेचा 13वा वर्धापन दिन मोठ्या थाटात संपन्न झाला.

 ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेचा कडा शाखेचा 13वा वर्धापन दिन मोठ्या थाटात संपन्न झाला.




कडा/प्रतिनिधी.



आष्टी तालुक्यातील कडा शहरांमध्ये ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँक या शाखेचा 13वा वर्धापन दिन आज  राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रवी काका ढोबळे यांच्या हास्ते फोटोला पुष्पगुच्छ, हार व श्रीफळ अर्पण करून बँकेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला..

बँकेचे मॅनेजर गणेश गुंजाळ यांनी तेज वार्ताशी बोलताना सांगितले की आम्ही ग्राहकांना चांगली सेवा देत आहेत व छोट्या मोठ्या व्यवसाय करणार्या व्यवसायिकांना तातडी कर्ज देऊन त्यांचा व्यवसाय दुप्पट कसा होईल या हेतूने ग्राहकांना तातडी कर्ज देण्यात येते व वयोवृद्ध पुरुष किंवा स्त्रिया अशा व्यक्तींना लिहिता वाचता येत नसेल तरी आमच्या शाखेमधील कर्मचारी हे स्वतः चलन भरून त्यांच्या पैशाची जेवण घेऊन करतात त्यामुळे ग्राहकांचे प्रेम व जिव्हाळा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे आमच्या बँकेचे खातेदार मोठ्या प्रमाणावर आहेत.

आमच्या बँकेमध्ये कोणताही खातेदार नाराज होणार नाही याची दक्षता मी व माझे सहकारी एक निष्ठेने काम करत आहोत असे बँकेचे मॅनेजर श्री गुंजाळ साहेब यांनी तेज वार्ताशी बोलताना सांगितले..

यावेळी बँकेचा वर्धापन दिन साजरा करताना बँकेचे मॅनेजर गणेश गुंजाळ साहेब, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रवी काका ढोबळे, विजय मिसाळ, महेश तावरे, महेश देशमुख, रसायली मॅडम, सय्यद बिलाल, काकासाहेब कर्डिले, छगन कर्डिले, पिताराम रसायली व बँकेचे सर्व खातेदार व बँकेचे सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा वर्धापन दिन सोहळा पार पडला.














टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.