KALYAN | मेट्रो मार्गास अडथळा होऊ नये म्हणून सप्टेंबरपासून एकाही बांधकामास परवानगी नाही;केडीएमसी नगररचनाकारांची माहिती
- कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती ते तळोजा हा मेट्रो रेल्वे प्रकल्प तयार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी २७ सप्टेंबर २०२३ रोजी एमएमआरडीए कार्यालयात पार पडलेल्या बैठकी पडली. या बैठकीच्या तारखेपासून कल्याण डोंबिवली महापालिकेने एकही बांधकामांना परवानगी दिलेली नाही. ज्या परवानग्या दिल्या होत्या. त्या यापूर्वीच्या आहेत अशी माहिती कल्याण डोंबिवली सहाय्यक संचालक नगररचनाकार दि. प्र. सावंत यांनी दिली आहे. कल्याण ते तळोजा हा मेट्रो मार्गाचा प्रकल्प विकसीत केला जाणार आहे. या मेट्रो मार्गावरील स्थानके निश्चित झाल्यावर महापालिकेने ट्रान्सीट ओरिएंटल झोन- टीओडी क्षेत्र विकसीत निश्चीत करायचे आहे. हे टीओडी क्षेत्र निश्चीत करण्याकरीता महापालिकेने एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्तांना पत्र पाठविले आहे की, मेट्रोच्या डिटेल प्लानचा नकाशा प्राप्त व्हावा. या मार्गाला अडथळा निर्माण होईल अशा एकाही बांधकामास २३ सप्टेंबरपासून परवागनी दिलेली नाही. ज्या काही परवानग्या दिल्या आहे. त्या या पूर्वीच्या आहेत. एमएमआरडीए कार्यालयाकडून मेट्राोस्थानके निश्चित केल्याचा नकाशा प्राप्त झाल्यास यापुढे बांधकाम परवानगी देताना एमएमआरडीएची ना हरकत घेतल्याशिवाय तसा प्रस्ताव मंजूरीसाठी घेतला जाणार नाही अशी माहिती सहाय्यक संचालक, नगरररचनाकार सावंत यांनी दिली आहे.


stay connected