हलक्या दुःखाचं उत्तर माय असेलही पण असह्य वेदनांचा वाली बाप च असतो- डॉ.जितीन वंजारे
*बाप झाल्याशिवाय बाप समजून येत नाही-डॉ.जितीन वंजारे*
जीवनात इतकं मोठं व्हा की जे आपल्या बापाने आपल्याला नाही दिलं ते आपल्याला आपल्या मुलाला देता आल पाहिजे.मुलाने हाथ लावलेल्या वस्तूला माप तोल न करता देता आल पाहिजे.मुलांचे लाड पुरवताना मुलांचा बालहट्ट,बायकोचं स्रीहट्ट आणि वयोवृद्धाची शारीरिक कमजोरी दूर करता आली पाहिजे त्यांना जीवनाचा योग्य वेळ आणि शक्ती देता आली पाहिजे.खर तर बाप होन म्हणजे मोठी जबाबदारी असून फक्त वंशज पुढे घेऊन जाणे इतकच ते काम नव्हे ,आलेल्या हजारो लाखो समस्यांचे आणि त्याचे निवारण केल्याचे ते परिपक्व फलित आहे.बाप होन म्हणजे जबाबदारी हातात घेऊन विस्तव पोळत आहे हे माहीत असूनही तो हातात घेण्यासारखे काम आहे .वैराग्य हे ताण तणाव मुक्त जीवन आहे पण सांसारिक जिवन अतिशय कठीण आणि वेदनादायी आहे.तसेच सांसारिक जीवनाचं अंतिम सत्य म्हणजे संघर्षमयी बाप होय.बाप होन म्हणजे स्वतःच्या शरीराच्या मासाची ठीगळ तोडून स्वतःच्या वंशजाची सजित मूर्ती तयार करण्यासारखं होय.जे स्वतःला अनुभवता आल नाही त्याची मुलाला अनुभूती करून देण्याची विलक्षण कल्पना करणारा माणूस म्हणजे बाप होय.बापाच्या जाग्यावर बाप असताना त्याचा प्रचंड राग येत असताना तो असता नसता स्वतः बाप झाल्यावर स्वतःच बापपण आठवून बापातला त्याकाळचा वाईट वाटणार बाप आता चांगला आणि सोईस्कर वाटलेला बाप समजून आलेला अवलिया म्हणजे बाप होय.बाप समजून घेणं कठीण आहे.ते समजायला पहिल्यांदा बाप व्हावं लागतं.मुलीची तनया,मुलाचा हट्ट,बायकोचा आकस,बापाचा राग,बहिणीचा रुसवा-फुगवा,आईचा मायेचा पदर,भावाची मदत , समाजाचा डोल हे सगळं समजायला पहिल्यांदा बाप व्हावं लागतं,सगळी नाती स्वार्थी की निस्वार्थी हे समजायला , समाजाकडून आपली फसवणूक की भलाई झाली हे समजायला,आपला-तुपला की अजून दुसऱ्याचा हे समजायला ,एकटेपणात,संकटात, चक्रव्यूहात पडल्यावर कोण आग कोण पाणी हे समजायला भाग पाडणारा प्रसंग म्हणजे परिस्थितीने घडवलेला हाच तो 'बाप' असतो.
जगातला सुंदर क्षण म्हणजे एका भविष्यातील बापाचा वर्तमानात बाप होन होय.कारण पोराचा बाप होन हे पोरीचा बाप होण्यापेक्षा नक्कीच कठीण असतं कारण पोरीचा बाप होन म्हणजे किमान आयुष्यातील नैराश्यमय परिस्थितीत धीर देण्याची सुलभ सुविधा होय जे की पोराकडून होन मुश्किल आहे .कारण तो पण भविष्यातला बाप आहे त्याचा संसार त्याला लागला की त्याला पिकलेली पान कुचकामी वाटतात, तो एका दूरच्या प्रवासावर निघाल्यावर निकटजनाच्या,रक्ताळलेल्या नात्याजवळ मुक्काम करत नाही कारण त्याला दूरचा प्रवास हवा असतो त्याचा मुक्काम ठरलेला असतो तो त्याच्या बापाने पण असाच अनुभवलेला असतो जे पूर्वाश्रमीचे फलित असते तेच पुढे चालू आहे.त्यामुळे बाप ही संकल्पना अखंड आहे जी विश्व सजीवातील हर एक जीवाला लागू आहे.ग्रामीण भागात बाप नसलेल्या मुलांना पोरकी मानलं जातं ते संस्काराने कसेही वागळे तरी जर कदाचित ते चुकलेच तर बिन बापाच्या मुलांना वेगळ्याच नजरेने पाहिले जाते.असंस्कारीत मुल अशी उपमा त्यांना दिली जाते त्यामुळे बापाचा थेट संबंध शिस्त,संस्कार,नियम,आणि गुरू मार्गदर्शक या नात्याशी जोडला जातो.त्यामुळे बापाला कधीही कमी लेखायच नसतं कारण आई सर्वजण सांगतात पण बापाला वर्णायला बाप असणारा लेखक लागतो थोड काही प्रॉब्लेम असल्यावर आई आठवते पण मोठा प्रॉब्लेम असल्यावर बापचं आठवतो .बाप नारळाचा बाहेरचा भाग असतो तर आई आतला कोमल आणि मधुर भाग असतो.त्यामुळे कठीण कवच हे सरक्षक असून कोमलतेला जपून ठेवणारा भाग म्हणजे बाप होय.घराचं घरपण असणारा बाप समाजाशी,संकटांशी दोन हात करून घराचं अस्तित्व कायम ठेवतो.बाप कठोर असतो पण सत्य परिस्थिती च मूर्तिमंत उदाहरण आहे .बाप त्यागाची आणि समर्पणाची उपमा आहे बाप सय्यमाची नांदी आहे .बाप चंदनापरी झिजनारा आणि दिव्यापरी जळून जगाला प्रकाश देणारा दिवा आहे .बाप प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव आहे आणि तोच मुख्य गुरू मित्र आणि संकटकाळाचा साथी आहे .मुलाच्या जीवनाचा खरा रस्ता बापाच्या सुपीक डोक्यातून जातो त्यामुळे बापाला अनुभव अनुसरण आणि जपन इतकच केलं तरी सत्कर्म झाल.


stay connected