शासनाचा कर बुडवणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करून घरचा रस्ता दाखवा, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष,नितीन सोनवणे.
आष्टी/ प्रतिनिधी
ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने जन माहिती अधिकाराच्या माहिती खाली माहिती मागितली असता समाज कल्याण कार्यालय बीड मधील अधिकारी यांनी माहिती दिली व माहिती अधिकाराच्या पत्रावर आपले स्वतःचे नाव न टाकता इंग्रजी हिंदी मराठी मातृभाषा मध्ये ओळखून न येणारी अशी पत्रावर सही करून पत्र दिले असता, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी सदरील अधिकारी यांना विचारले साहेब माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवलेली आपण दिली त्याची फीस किती आहे त्यांनी सांगितले 94 रुपये आहे पण तुम्हाला पावती देण्यासाठी आमच्याकडे पावती बुक नाही कारण मी चार महिने झाले समाज कल्याण ऑफिसला बदलून आले आहे तेव्हापासून कोणालाही पावती देण्यासाठी आमच्या ऑफिसमध्ये पावती बुक नाही त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे मॅडम यांनी समाज कल्याण ऑफिस मधील चाललेला भोंगळा कारभार याकडे लक्ष घालून थांबवावा अन्यथा ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालणा समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकार दिला आहे..
[शासनाचा कर बुडून आपल्या अकलेची हुशारी दाखवून पावती न फाडता अधुरी माहिती देऊ लागले 47 पानाची माहिती सांगून माहिती मागण्याच्या हातामध्ये दिले 22 पाने]
जिल्हाधिकाऱ्यांनी आशा अधिकाऱ्यांचं निलंबन करून यांना थेट घरचा रस्ता दाखवा.


stay connected