प्रगती करताना जेवढे अडअडथळे तेवढा माणूस मोठा होतो- Doctor Lahane

 प्रगती करताना जेवढे अडअडथळे तेवढा माणूस मोठा होतो- Doctor Lahane




   सात्रळ- वार्ताहर-माणसाला जर आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर माणसाने आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांना सामोरे गेले पाहिजे तसेच शिक्षण घेताना आपण मुंगीसारखी जिद्द ठेवली पाहिजे.खरंतर विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना कला गुणांनाही वाव दिला पाहिजे.त्याचप्रमाणे स्वतःच्या आयुष्याची भावनिक परिस्थिती सांगताना म्हणाले की माझ्या आईनं माझ्यासाठी किडनी अवयव देऊन मला पुनर्जन्म दिला.असे प्रतिपादन कॉ.पी.बी कडू पाटील समाजक्रांती पुरस्काराचे मानकरी पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी सात्रळ येथे झालेल्या समाजक्रांती पुरस्कार आणि मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती पारितोषिक वितरण समारंभात केले.

      त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले भास्कराव पेरे पाटील यांनी आपल्या मनोगतातून प्रेक्षकांना खळखळून हसवत म्हणाले.माणसानं कधीच रडायचं नसतं.फक्त लढायचं असतं.आपल्या कामात देवाला बघायचे.म्हणजेच देशसेवा हीच ईश्वर सेवा अशी भावना आपण बाळगली पाहिजे.असे विचार भास्करराव पेरे यांनी मांडले.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान असलेले पांडुरंग अभंग यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी केले.

         उपस्थित मान्यवरांनी कर्मवीर भाऊराव पाटील,कॉ.पी.बी.कडू.पाटील आणि मातोश्री शांताबाई कडू पाटील यांच्या प्रतिमेस तात्याराव लहाने, भास्करराव पेरे, पांडुरंग अभंग, डॉ.रागिनी पारेख आदि मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली.

        या कार्यक्रमासाठी उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, डॉ.गोंदकर, सुरेश वाबळे, बाळासाहेब विखे, शिवाजी शेलार,विजयराव दंडवते,कॉ.डांगे, डॉ.अजित पाटील, मंगलताई राजळे, मीनाताई विखे, अर्जुन राजळे, डॉ.घावटे,प्रभाताई घोगरे,प्राचार्य विखे, अच्युतराव बनकर,सुधीर म्हस्के,शांतीभाऊ गांधी,नानासाहेब जगताप,ॲड.विजयराव कडू, भास्करराव फणसे, संभाजीराव चोरमुंगे, किशोर शेठ भांड,किरण कडू,पंकज कडू, विक्रांत कडू, प्राचार्य राजेंद्र बडे, मुख्याध्यापिका अनिता निबे, पर्यवेक्षिका सुशिला थोरात तसेच परिसरातील अनेक पदाधिकारी, माजी आजी प्राचार्य,रयत सेवक, ग्रामस्थ तसेच आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती पारितोषिक समारंभात रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मुख्याध्यापकामध्ये भास्कर कोकाटे, शिक्षकांतून संदिप चव्हाण, सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका म्हणून उमा चव्हाण व राज्य स्तरावर उल्लेखनीय विशेष कार्य करणाऱ्या मंगेश कडलग, सचिन पलघडमल, सच्चिदानंद झावरे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच झी मराठी वाहिनीवर सा रे ग म पा चा उपविजेता जयेश खरे आणि संगीतकार प्रतिक, ऋतिक पलघडमल यांनी शाहीर आण्णा भाऊ साठेची गाजलेली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली ही शब्दरचना सादर केली.

        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गभाले आणि मंगेश कडलग  यांनी केले तर आभार प्रदर्शन रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी मानले.












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.