श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठानिमित्त सोमवारी शहरातील मांसविक्री बंद ठेवण्याचा निर्णय.. - नगराध्यक्ष जिया बेग
******************************
****************************
आष्टी(प्रतिनिधी)
अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर येथील भगवान रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह संपूर्ण देशभरात आहे... प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवार दि.२२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे.यामुळे संपूर्ण देशभरातील वातावरण श्रीराममय झाले आहे.देशभरातील राम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या दिवशी मटण, चिकन,मासे,विक्री करणारे सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असून त्या दिवशी मांसविक्री होणार नाही..असा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती आष्टी नगरपंचायतचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी दिली आहे...
अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आष्टी शहरातील मांसविक्री व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आष्टीतील मटण,चिकन,मासे,विक्री करणारे दुकाने बंद ठेवण्यात येणार असून सोमवार दि.२२ जानेवारी रोजी आष्टीत मांसविक्री होणार नाही.राम मंदिरातील प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे.हेच पाहता आष्टीतील सोमवार दि. २२ जानेवारी रोजी मांसविक्री बंद ठेवण्याचा सर्व संबंधित दुकानदारांनी निर्णय घेतला असल्याची माहिती आष्टी नगरपंचायतचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी दिली...


stay connected