उत्कृष्ट डेंटिस्ट २०२४ पुरस्कारा साठी डॉ .महेश नाथ यांची निवड

 उत्कृष्ट डेंटिस्ट २०२४ पुरस्कारा साठी डॉ .महेश नाथ यांची निवड







आष्टी ( प्रतिनिधी ) - फेमडेंट एक्सलंन्स इन डेंटीस्ट्री अवार्ड साठी कडा  येथील डॉ . महेश नाथ यांची निवड करण्यात आली आहे . ४५ वर्षाखालील उत्कृष्ठ दंतवैद्य श्रेणीतील पुरस्कारासाठी मराठवाड्यातुन एकमेव कडा येथील डॉ . महेश नाथ यांचे नामांकन झाले आहे . डॉ महेश नाथ यांच्या दंतवैद्य क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांची पुरस्कारासाठी नामांकनाची  घोषणा करण्यात आली आहे . हा पुरस्कार वितरण सोहळा २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता द क्लब मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे .

द फॅमडेंट एक्सलन्स च्या दंतचिकित्सा पुरस्कार दंत व्यवसायातील उत्कृष्टतेची सर्वोच्च मानके म्हणून ओळखतात, संबंधित क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात येते. दंतचिकित्सा क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान करणे आणि भारतातील दंतचिकित्साच्या उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

पुरस्कारासाठी या क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याचे बारकाईने निरीक्षण केले जाते तसेच कठोर निर्णय प्रक्रियेमुळे दंतचिकित्सा पुरस्कारात फॅमडेंट एक्सलन्स जिंकणे सहज सोपे नाही; विजेत्यांना त्यांच्या  श्रेणींमध्ये खरे दिग्गज शोधणे हा या पुरस्काराचा हेतू आहे .

दंतचिकित्सा क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि अनुभवी व्यावसायिकांचा समावेश असलेल्या स्वतंत्र जूरीद्वारे पुरस्कारांची घोषणा केली जाते . गेल्या  अनेक वर्षांपासून डॉ महेश नाथ दंत वैद्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करत असुन या पुर्वीही त्यांनी विवीध उच्च पुरस्कार पटकावले आहेत ज्यात दंतवैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक  कार्याबद्दल २०१७ मध्ये दिल्ली येथे IDA  चा सर्वोच्च सुश्रुता पुरस्कार ,लिमका बूक व  गोल्डन बुक मध्ये नोंद  इत्यादी . त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व मित्रपरिवार व विवीध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे .







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.