ऊसतोडणी मजुरांना सुविधा आणि मुकादमांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार.. आ.सुरेश धस यांची ग्वाही..

 ऊसतोडणी मजुरांना सुविधा आणि मुकादमांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार..
 आ.सुरेश धस यांची ग्वाही..

**********************************

विविध ऊसतोड संघटनांकडून आ.धस यांचे आभार मानत सत्काराचे आयोजन..

*******************************




 आष्टी (प्रतिनिधी)

 भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई साहेब मुंडे यांचे नेतृत्वाखाली.. ऊसतोडणी कामगार आणि मुकादम संघटनांना बरोबर घेऊन संघर्ष केल्यामुळे या करारा वेळी ऊसतोडणी कामगार आणि मुकादम यांना ऊस तोडणीचा दर आणि मुकादमांचे कमिशन यामध्ये भरीव वाढ मिळाली असून यापुढे देखील रात्रंदिवस काबाडकष्ट करणारे ऊस तोडणी मजुरांना मूलभूत सुविधां बरोबरच आरोग्य, शिक्षण आणि आणि ऊस तोडणी मुकादम यांच्या हिताचे निर्णय होण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहून शासन दरबारी त्यांच्यासाठी लढत राहू..अशी ग्वाही आ.सुरेश धस यांनी दिली. 

      आष्टी येथे ऊस तोडणी कामगार आणि मुकादम संघटनांच्या वतीने ऊसतोडणी दर आणि मुकादम यांच्या कमिशनमध्ये चांगली दरवाढ मिळवून दिल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकनेते स्व.गोपीनाथराजी मुंडे ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष सुखदेव सानप, सचिव सुरेश वनवे, भाऊसाहेब आंधळे, दत्तोबा भांगे, विष्णुपंत जायभाये, संजय तिडके, देविदास तोंडे, चाळीसगावचे विश्वजीत पाटील, मालेगावचे माळी पोलीस हे उपस्थित होते.

                 पुढे बोलताना आ.सुरेश धस म्हणाले की,या दरवाढी बद्दल..आपण राज्यातील सर्व संघटनांचेवतीने एकत्रितपणे पंकजाताईसाहेब मुंडे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करू..शंकरराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना बबनराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखालील संघटनांनी लढा दिल्यामुळे ऊस तोडणी मजूर आणि मुकादम यांना ६५ टक्के भाव वाढ देण्यात आली त्यानंतर ऊस तोडणी मजूर आणि मुकादमांचे  नेतृत्व स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी ऊसतोड मजूर आणि मुकादम यांना ७० टक्के एवढी भाववाढ मिळवून दिली.त्यावेळी मी वेगळ्या राजकीय पक्षात होतो तरीही मी ऊसतोड कामगारांच्या आणि मुकादमांच्या या जिव्हाळ्याच्या असलेल्या प्रश्नावर याबाबत एकत्रित निर्णय घेतले राज्यात ऊस उत्पादन जास्तीचे झाले असता ऊस तोडणी मजूर आणि मुकादम यांच्या प्रश्नांची साखर संघ आणि कारखानदार  काळजी करत नसतात परंतु ऊस उत्पादन कमी असताना या दोन्ही घटकांचे महत्त्व वाढत असते साखर संघ आणि साखर कारखानदार यांच्याकडून ऊस तोडणी मजुरांना दरवाढ आणि मुकादमांना कमिशन वाढवून घेणे हे सोपे नसते ऊस तोडणी कामगार आणि मुकादम यांच्या अनेक संघटना आहेत परंतु त्यातल्या काही संघटना या मजूर आणि मुकादमांशी निगडित नाहीत दुर्दैवाची गोष्ट अशी की काही संघटनेच्या अध्यक्षांना सध्याचा ऊसतोडणी दर देखील माहित नसतो परंतु  कारखानदारांचे हित जपण्यासाठी संघटनांमध्ये फूट पाडण्याचे काम करत असतात त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या सर्व संघटनांनी एकत्रितपणे सर्व समन्वय ठेवून एकमेकांशी सुसंवाद ठेवून काम करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे..

 कारण हा ऊस तोडणी व्यवसाय संकटात आलेला आहे कारण ऊस तोडणी साठी अग्रिम रक्कम वाटप करण्यात आलेल्या मजुरांकडून अनेक मुकादमांची फसवणूक झालेली आहे परंतु यासाठी कडक कायदे नसल्यामुळे मजूरांच्या ऐवजी मुकादमांवर गुन्हे दाखल होतात कारखाना प्रशासन पोलीस प्रशासनाला हाताला धरून मजूरां ऐवजी मुकादमांवर गुन्हे दाखल करत आहेत हे चुकीचे असून यासाठी शासनाने कठोर कायदा करण्याची आवश्यकता असून लवकरच याचा मसुदा तयार होणार आहे असे सांगितले.. ऊस तोडणी मजुरांकडून मुकादमांची फसवणूक टाळावी यासाठी काही उपाय करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून आ.सुरेश धस म्हणाले की प्रत्येक साखर कारखाना प्रशासनाने आपल्या यंत्रणेद्वारे मजुरांची ऑनलाइन नोंदणी करावी आणि त्याची माहिती मुकादमांना द्यावी मुकादमांना देखील स्वतंत्र (लायसेन्स )परवाना देण्यात यावा..

 मुकादमांनी आपली स्वतंत्र यंत्रणा तयार करून कोणत्या मुकादमाकडे कोणत्या मुजराची उचल असून एका मजुराने अनेक मुकादमांकडून उचल घेऊ नये यासाठी आपसातील व्यवहाराची माहिती एकमेकांना देऊन माहिती करून घ्यावी जेणेकरून फसवणूक करणारे मजूर माहिती होतील आणि ज्या मजुरांनी यापूर्वी फसवणूक केलेली आहे त्यांची वेगळी स्वतंत्र नोंद घेण्यात यावी कारण तीन मुकादमांची फसवणूक करून चौथ्याकडील उचल घेणे घेणे आणि कामावर न जाता पळून जाणे असे भयंकर प्रकार त्यातून  कमी होतील यासाठी  भा.द.वि.४२० अशा कलमान्वये 

अजामीन पात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे आवश्यक झाले आहे.. फसवणूक झाल्यामुळे अनेक मुकदमांनी आत्महत्या केल्या असून अनेक मुकादमांनी १० ते २० लाख रुपयांना फटका बसल्यामुळे व्यवसाय बंद केले आहेत ऊस तोडणी मजुरांची उचल, मुकादमांनी दिलेले पैसे, वाहतूकदार मुकादमांनी दिलेले पैसे..

 हा सर्व व्यवहार कायद्याच्या कक्षेत बसवण्यासाठी मसुदा तयार करण्याचे काम चालू असून लवकरच..

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आणि लोकनेत्या पंकजाताई साहेब मुंडे यांचे मार्गदर्शनानुसार याबाबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगून आ.सुरेश धस पुढे म्हणाले की,

 या बाबत कायदा तयार करण्यासाठी काही संघटनांना काही सूचना द्यायच्या असतील तर त्यांनी त्या लेखीपत्र देऊन आपले म्हणणे मांडावे म्हणजे हा कायदा अधिक चांगला करण्यास मदत होऊ शकेल असे सांगितले..

 ऊस तोडणी मजूर आणि मुकादम संघटनांनी एकत्रितपणे संघटितपणे काम करून ज्याप्रमाणे ऊस तोडणी दर आणि कमिशन दरामध्ये वाढ पदरात पाडून घेतली त्याचबरोबर ऊस तोडणी मजूर यांच्या आरोग्यासाठी यांच्या शिक्षणासाठी तसेच स्थलांतरित पाल्यांसाठी सुरक्षेच्या उपाययोजनांची आवश्यकता असून या ऊस तोडणी मजुरांना विमा संरक्षण जखमी झाल्यास ५ लाख रु.आणि मयत झाल्यास कुटुंबीयांना १० लाख रु.यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश करण्यात यावा.. त्याचबरोबर बैलांचा मृत्यू झाल्यास ७० हजार रु. आणि जखमी झाल्यास ३५ हजार रु.अशा प्रकारचा विमा मंजूर करावा तसेच या ऊस तोडणी मुजरांना रात्रंदिवस ऊस तोडणी करताना सतत शिळेपाके अन्न खावे लागते त्यावर उपाययोजना म्हणून बांधकाम कामगारांना ज्याप्रमाणे "मध्यान्ह भोजन " योजना लागू आहे त्याच धर्तीवर लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी महामंडळाद्वारे किंवा शासनाद्वारे या ऊस तोडणी मजुरांना " पहाटेचे भोजन " पहाटे ३ ते ५ त या वेळेमध्ये तयार केलेले ताजे जेवणाची मिळण्यासाठी सोय करण्याची एका ठिकाणी तयार करून ऊस तोडणी सुरू असलेल्या ठिकाणी डबे पोहोचवण्याची सोय करावी.. तसेच महिला कामगारांच्या बाळंतपणासाठी त्यांना २५ हजार रु.अनुदान देण्यात यावे..

 तसेच सर्वात महत्त्वाचे असलेले ज्या गावी हार्वेस्टर ने ऊस तोडणी सुरू असेल त्या ठिकाणी मुजरांनी ऊस तोडू नये कारण चांगल्या दर्जाचा ऊस हार्वेस्टरने तोडण्यात येतो आणि उर्वरित ऊस हा मजुरांकडून तोडण्यात येतो त्यामुळे मजुरांचे नुकसान होत असते त्यामुळे मुकादमांनी अशा ठिकाणच्या ऊस तोडीच्या चिठ्ठ्या मजुरांना देऊ नयेत.. मजूरांनी असा निर्धार करावा असे त्यांनी शेवटी सांगितले... 

यावेळी प्रवीण बांगर, अशोक बडे, तुकाराम महाराज तिडके, तात्यासाहेब घुले,बाळासाहेब जोगदंड,महादेव शेंडगे, महादेव दराडे, चंद्रभान मुंडे, अर्जुन तिडके, पिंटू डोंगरे, पोपट सानप, हनुमंत काळे, महादेव झनझन, विकास सानप, बाबुराव केदार,नारायण बडे,बाजीराव सपकाळ राजाभाऊ विघणे, आश्रू कदम आदी उपस्थित होते.




मुकादमांनी संघटित व्हावे.. आपसात समन्वय ठेवावा.. आपसातील मजुरांची माहिती ठेवावी फसवणूक करणाऱ्यांवर लक्ष ठेवावे.. मजूरांशी रोखीने व्यवहार न करता.. चेकने किंवा आरटीजीएस ने करावेत.. ज्यादा अग्रीम रक्कम वाटप करू नये.. मजूर,आणि मुकादम दोघेही सुखी राहतील.. 

- सुखदेव सानप 

अध्यक्ष, लोकनेते गोपीनाथरावजी ऊसतोड कामगार संघटना 

महाराष्ट्र राज्य





ऊस तोडणी मजुरांसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करून मजूरांचे आधार कार्ड लिंक करण्यात यावे..

 उचल रकमे बाबतची माहिती घ्यावी.. फसवणूक करणाऱ्या मजूरांच्या तयार झाल्या आहेत..

 उचल घेतलेल्या मजुरांची माहिती व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यावर पाठवावी जेणेकरून मुकादमांची फसवणूक होणार नाही..

- विश्वजीत पाटील

 सदस्य,

 लोकनेते गोपीनाथ रावजी ऊसतोड कामगार संघटना महाराष्ट्र राज्य




आमदार सुरेश धस हे ऊस तोडणी मजूर आणि मुकादमाची बाजू लावून धरणारे एकमेव आमदार असून राज्यातील सर्व आमदारांनी आपल्या क्षेत्रातील ऊस तोडणी मजुरांची, मुकादमांची काळजी घ्यावी.


 - बाबुराव केदार









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.