उद्या पासून आष्टी उपबाजार समितीत आ. सुरेश धस यांच्या हस्ते कांदा खरेदीला सुरुवात -----सभापती रमजान तांबोळी

 उद्या पासून आष्टी उपबाजार समितीत आ. सुरेश धस यांच्या हस्ते कांदा खरेदीला सुरुवात
-----सभापती रमजान तांबोळी

*********************************

 



*************************************

आष्टी तालुक्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारपेठ आष्टी येथे कांदा खरेदीचे आ.सुरेश धस यांंच्या हस्ते उद्या शुक्रवार दि.१९ जानेवारी  रोजी उद्घाटन होणार असून या उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी यांनी केले आहे.

आष्टी आणि आष्टी परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांदा बाजारपेठीची अडचण समजून आमदार सुरेश धस यांच्या आदेशाने आष्टी उपबाजार समिती येथे ही कांदा खरेदीला केंद्राला उद्यापासून सुरुवात होत असून यामुळे शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होणार असून कडा बाजार पेठे प्रमाणे याही बाजार पेठेत कांदाला दर मिळणार असून आष्टी परिसरातील शेतकऱ्यांनी या बाजारपेठेत कांदा आवक वाढवावी तसेच शेतकऱ्यांनी उद्या शुक्रवार दि. १९ जानेवारी रोजी होणाऱ्या कांदा खरेदीच्या उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सभापती रमजान तांबोळी यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार साहेबराव दरेकर (नाना) तर  प्रमुख उपस्थिती भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के,जि.प.सदस्य अमर निंबाळकर, नगराध्यक्ष जिया बेग,माजी उप सभापती आदिनाथ सानप,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,रंगनाथ धोंडे सभापती बद्रीनाथ जगताप,सहाय्यक निबंधक बाळकृष्ण शिंदे,उपसभापती नामदेव धोंडे, सचिव एच. के. गळगटे वसर्व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कडा आदीच्या उपस्थितीत हा उदघाटन सोहळा होणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती सभापती रमजानशेठ तांबोळी यांनी केली आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.