आष्टी पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..! तब्बल १४१ रक्तदात्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

 आष्टी पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..!
तब्बल १४१ रक्तदात्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी



आष्टी /प्रतिनिधी 

पोलीस सप्ताहानिमित्त

आष्टी पोलीस ठाण्यात समाजाप्रति उदात्त भावना बाळगून रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात विविध क्षेत्रातील १४१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासली. आष्टीचे पोलीस निरिक्षक संतोष खेतमाळस यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.

आष्टी पोलीस ठाण्यात मंगळवार दि. २ ते ८ जानेवारी दरम्यान रक्तदान शिचीरासह शाळा, महाविद्यालयीन मुला-मुलींसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाअंर्तगत प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील जवळपास दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज कसे चालते, ठाण्यातील आधुनिक शस्त्र, दारुगोळा व इतर साहित्य दाखवून त्याविषयी माहिती सांगण्यात आली, शालेय मुला मुलींना रस्ता वाहतुकीचे नियम, महिला सशक्तीकरण, सोशल

मिडीया, सायबर गुन्हे तसेच

मुलींना संरक्षण, निर्भयतेचे धड़े देण्यात आले. सोमवार दि. ८ रोजी पोलीस ठाण्यात प्रथमच घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला सर्वस्तरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. पोलीस निरिक्षक संतोष खेतमाळस यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करुन त्यांचा सन्मान करण्यात आला, पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांनी व पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी पोलीस स्थापना सप्ताहानिमित्त राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सपोनि विजय देशमुख, सपोनि भाऊसाहेब गोसावी, पोउपनि अर्जुन चाटे, पोउपनि कृष्णा शिदे सह पोलीस कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांचे सपोनि देशमुख यांनी आभार मानले.











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.