जामखेडचा आपला दवाखाना सलाईनवर, एक महीन्यांपासून डॉक्टरच नसल्याने होत आहेत रुग्णांचे हाल
आर्थिक खर्च करून सुरु केलेला आपला दवाखाना बनला शोभेची वस्तू
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरात शासनाच्या वतीने सार्वजनिक अरोग्य विभागाच्या मार्फत मोठा खर्च करून हिंदुद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. मात्र या ठीकाणी गेल्या एक महिन्यापासून डॉक्टरच नसल्याने सध्या तरी हा दवाखाना सलाईनवर आहे. परीणामी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.
ग्रामीण तसेच शहरीभागातील गोरगरीब रूग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी आपला दवाखाना ही संकल्पना आम्लात आली त्याठिकाणी प्राथमिक मोफत उपचार मिळत आसल्याने त्याचा लाभ रूग्णांना मिळु लागला परंतु या दवाखान्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी रुग्ण करत आहेत कारण हा दवाखाना दुपारी दोन वाजता सुरू होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांना त्याची सेवा मिळत नाही आसच प्रकार आज सकाळी पहावयास मिळाला.
जामखेड शहरातील एका दिव्यांग बांधवाला उपचारासाठी प्रहारचे तालुका अध्यक्ष नय्युमभाई शेख हे आपला दवाखाना या ठिकाणी घेऊन गेले आसता त्याठिकाणी कोणीही कर्मचारी उपलब्ध नव्हते दुरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला आसता कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने दिव्यांग बांधव शेख यांनी ठिकाणी बोलताना तिव्र नाराजी व्यक्त केली एक तर दिव्यांगांना उपचार घेण्यासाठी दुसऱ्यांवर आवलंबुन राहावे लागते कसंबसं कोणाच्यातरी मदतीने याठिकाणी गेले तर उपचारासाठी डॉक्टर नाही त्यामुळे यावर मार्ग काढावा.
यावेळी बोलताना शेख म्हणाले की शासनाने आपला दवाखाना म्हणून गाजावाजा करत फक्त बोर्ड लावले जाहिरातीसाठी मोठा खर्च केला. परंतु प्रत्यक्षात येथे कसलीही सुविधा सद्या स्थितीत मिळत नाही त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष्य घालुन ताबडतोब रूग्णसेवा सुरळीत करावी आन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
stay connected