राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन

 राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे
उद्घाटन



कडा  (प्रतिनिधी): आष्टी येथील पंडित जवारलाल नेहरू उच्च माध्यमिक विद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उदघाटन आष्टी तालुक्यातील वाकी या गावी मोठ्या उत्साहात

 झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राजू (काका) धोंडे हे होते.

भगवान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ, पंडित जवाहरलाल नेहरू उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य

प्रा .सुनील भवर वाकी गावच्या सरपंच सौ सपना आस्वर , उपसरपंच श्री सोमीनाथ आस्वर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.


या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना भगवान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अज्ञान अंधश्रद्धा दूर करणे, मुला मुलींच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे, समाज जागृती निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केले जाते.


या कार्यक्रमाच्या वेळी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा. सुनील भोज म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढल्यामुळेच आज अनेक माध्यमिक उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयात अनेक मुली उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर विराजमान झालेल्या आपणास दिसतात याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते. आधुनिक युगात स्त्रियांना जो मान सन्मान मिळत आहे त्याचे श्रेय सावित्रीबाईंना जाते म्हणून मुलींनी सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील वाटचाल करावी.

आधुनिक युगात फॅशन युक्त पद्धती, स्त्रियांची छेडछाड, मुलींच्या वाढत्या वयाची समस्या, विवाहाचे वाढते वय, कौटुंबिक हिंसा, बलात्कार यासारख्या गंभीर समस्या आज निर्माण होत आहे अशावेळी स्त्रियांनी या समस्यांना सामोरे जाणे काळाची गरज आहे.


या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. बाळासाहेब गावडे यांनी केले तर आभार प्रा. अच्युत गायकवाड यांनी मानले. राष्ट्रीय सेवा योजना चा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सूर्यकांत धोंडे, प्रा. अच्युत गायकवाड, प्रा . चांगदेव सानप यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या वेळी वाकी गावातील समस्त गावकरी मंडळी, सर्व महिला, पंडित जवारलाल नेहरू उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका उपस्थित होत्या.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.