कलम 307 मधून आरोपींची निर्दोष मुक्तता - ॲड सय्यद अजीम

 कलम 307 मधून आरोपींची निर्दोष मुक्तता - ॲड सय्यद अजीम



बीड (प्रतिनिधी)बीड पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध फिर्यादीने गुन्हा रजिस्टर. क्रमांक 264/2018 मध्ये दोन्ही आरोपीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने पाठीत खंजीर खुपसले म्हणून 307.323.34 व भारतीय शास्त्र कायदा कलम 4.27 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

त्यामध्ये पेठ बीड पोलीस ने आरोपी क्रमांक 1 व 2 विरुद्ध दोषारोप पत्र मा.न्यायालयात पाठविले होते. त्याला सेशन केस क्रमांक 166/2021 असा नंबर मिळाला होता.

सदर केस मध्ये सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले होते. आरोपी क्रमांक 1व 2 यांच्याविरुद्ध पुरावा नाही मिळाल्या वरून मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधिश बीड यांनी दोन्ही आरोपींना निर्दोष मुक्त केले असून आरोपीतर्फे ॲड सय्यद अजीम यांनी काम पाहिले व ॲड सय्यद अजीम यांना ॲड सय्यद मिनहाज यांनी सहकार्य केले.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.