पुरोगामी पत्रकार संघाच्या २०२४ च्या दिनदर्शिकेचे आ.बाळासाहेब आजबे,मा.आ. भीमराव धोंडे व पूज्य श्रामनेर संघाच्या हस्ते पत्रकार दिनी प्रकाशन!
आष्टी/प्रतिनिधी
पुरोगामी पत्रकार संघ आष्टी(रजी.)हा गेली तीन वर्षापासुन तालुक्यात पुरोगामी विचारधारेची पत्रकारीता करत आहे,त्यातील पत्रकार बांधव देखील नेहमीच पुरोगामी चळवळीला पुरक आशी आपली पत्रकारीता करत आपल्या लेखनीच्या माध्यमातुन तालुक्यातील विविध प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधुन घेण्याचे काम करत आहे त्याच बरोबर सामान्यांना न्याय देण्याचे ही काम करत आहे,सर्व समावेशक सामान्य वक्ती ते तालुक्यातील जबाबदार नेत्यांच्या बातम्यांना नेहमीच प्रधान्य देत काम करत आहे.संघ गेल्या दोन वर्षापासुन दिनदर्शिकाचे प्रकाशन करत आहे या वर्षी पुरोगामी पत्रकार संघाच्या २०२४ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आ.बाळासाहेब आजबे,मा.आ. भीमराव धोंडे व पूज्य श्रामनेर संघाच्या हस्ते व तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार दिनी प्रकाशन करण्यात आले यावेळी संघाचे पदाधिकारी,हितचिंतक,जाहिरातदार व नागरिक,आदी उपस्थित होते.
stay connected