युवा पत्रकार संघ सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर - ह.भ.प बबन महाराज बहिरवाल

 युवा पत्रकार संघ सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर  - ह.भ.प बबन महाराज बहिरवाल




आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने सहा जेष्ठ पत्रकारांचा सन्मान करुन दर्पण दिन उत्साहात साजरा 


आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात अनाथ आश्रम, वृध्दाश्रम, तसेच गरीब व अनाथ विद्यार्थांना शैक्षणिक मदत या सह गोरगरीब जनतेला मदत करून समाजोपोयोगी विविध प्रकारचे उपक्रम राबवत असून इतर पत्रकार संघटनेने ही असे उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करावी असे प्रतिपादन हभप बबन महाराज बहीरवाल यांनी शुक्रवार दि ६ जानेवारी रोजी कडा येथील मदन महाराज संस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या दर्पण दिना प्रसंगी केले. 

दर्पण'दिनाचे औचित्य साधून आष्टी तालुका युवा पत्रकार संघाने तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार दिगंबर बोडखे, राजेश राऊत, तेजवार्ताचे संपादक बबलूभाई सय्यद, मनोज सातपुते,रघुनाथ कर्डीले,जेष्ठ पेपर वितरक भिमराव गुरव यांचा फेटा बांधून शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप बबन महाराज बहिरवाल होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय विधाते यांनी केले तर जेष्ठ पत्रकार सिताराम पोकळे, संतोष दाणी, शिवाजी सुरवसे, ज्ञानदेव थोरवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम,उपाध्यक्ष निसार शेख, जावेद पठाण,कार्याध्यक्ष अक्षय विधाते, संघटक अतुल जवणे, कोषाध्यक्ष आण्णासाहेब साबळे,गहिनीनाथ पाचबैल, समीर शेख, संतोष नागरगोजे, संतोष तांगडे, किशोर निकाळजे, प्रेम पवळ, दादा पवळ,राजु मस्के, संतोष दाणी,बा म पवार, राजेंद्र लाड, शहानवाज पठाण, संदिप जाधव,सुभाष सोनवणे, परमेश्वर कर्डीले, दिलीप दाणी यांच्यासह आदी मान्यवर व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.बहारदार सुत्रसंचलन संतोष दाणी यांनी केले तर आभार अध्यक्ष अविनाश कदम यांनी मानले.


आष्टी तालुका युवा पत्रकार संघ नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून पत्रकार बांधव हे तालुक्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.युवा पत्रकार संघाने जेष्ठ पत्रकार बांधवांचा सन्मान करुन गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याने त्यांचा आदर्श नक्कीच तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असून युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरोद्गार शिक्षक नेते बा म पवार यांनी काढले.












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.