अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करावा.. आ.सुरेश धस यांचे आवाहन
********************************
*********************************
आष्टी (प्रतिनिधी )
आगामी २ फेब्रुवारी रोजी असणारा वाढदिवस अत्यंत साधेपणाने.. सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करावा असे आवाहन आ. सुरेश धस यांनी केले आहे.
मतदारसंघातील सर्व नागरिक, मतदार बंधू भगिनी,आणि हितचिंतकांना त्यांनी याबाबत अत्यंत कळकळीचे आवाहन केले असून मोठे फ्लेक्स बोर्डाद्वारे शुभेच्छा, जाहिरातींचे फलक, होर्डिंग्ज..आणि डी.जे. बँड बाजा मिरवणूक इत्यादी कार्यक्रम आयोजित न करता.. गरजवंत लोकांना अन्नधान्य, कपडे, दैनंदिन गृह उपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, आरोग्य तपासणी शिबिरे, दिव्यांगांना साहित्य वाटप अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून शुभेच्छा जाहिरातींचे फलक, फ्लेक्स, होर्डिंग्ज या सारखा अनावश्यक खर्च टाळावा तसेच दरवर्षीप्रमाणे मी यावर्षी २ फेब्रुवारीला भेटून शुभेच्छा देखील घेणार नाही असे आवाहन आ.सुरेश धस यांनी केले आहे..


stay connected