शिक्षण म्हणजेच जिवनाची संपुर्ण तयारी :- डॉ आनंद वाघ
कडा ( वार्ताहर):- शिक्षण म्हणजेच जिवनाची संपुर्ण तयारी आहे, विद्यार्थ्यांनी जिवनात यशस्वी होण्यासाठी शरीर, मन, बुद्धी चांगले ठेवण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाचे संचालक डॉ. आनंद वाघ यांनी कडा येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर व आनंदराव धोंडे महाविद्यालय कडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय विद्यार्थी समुपदेशन शिबिराचा समारोप व विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमप्रसंगी डॉ. वाघ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे सिनेट सदस्य व प्राचार्य डॉ. हरिदास विधाते होते.
डॉ. आनंद वाघ यांनी सांगितले की, आनंदराव धोंडे महाविद्यालयाचा
हा विभाग चांगले काम करीत आहे. प्राचार्य डॉ. विधाते यांचेही काम चांगले आहे. शिक्षका पेक्षा विद्यार्थीनी मोठे व्हावे असे प्रत्येक शिक्षकाला वाटते. सतत काम करणारा माणूस जिवनात यशस्वी होतो. प्राचार्य विधाते हे वाणिज्य विभागाचे असले तरी त्यांचा
वनस्पती शास्त्राचा चांगला अभ्यास आहे. महाविद्यालयाच्या बागेत अनेक औषधी वनस्पती लावलेल्या आहेत त्यांची त्यांना चांगली माहिती आहे. ज्ञान सर्वांकडे आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत गेले पाहिजे त्यामुळे विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास होतो.
जग हे रंगमंच आहे आपण सर्व यातील कलाकार आहोत. प्रत्येकाकडे जन्मताच वेगवेगळे चांगले गुण असतात. तुमच्याकडे असलेले गुण विकसित करा, आवडीच्या क्षेत्रात जावुन काम करा त्यामुळे कामाचा ताण होत नाही. .
सर्व ताकद लावून ध्येय साध्य करा. अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांनी सांगितले की, डॉ. आनंद वाघ यांचे विद्यापीठातील काम चा़गले आहे . कोणतेही काम सहज करण्यासाठी प्रत्येकाने प्राणायाम , ध्यान योगा करावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सज्जन गायकवाड यांनी केले
सुत्रसंचलन समन्वयक प्रा. डॉ. शाम सांगळे यांनी केले. उपस्थितीतांचे आभार प्रा. डॉ. उपप्राचार्य डॉ. बापु खैरे यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. संभु वाघुले, उपप्राचार्य डॉ. भास्कर चव्हाण, उपप्राचार्य डॉ. बापु खैरे, प्रा. डॉ. सुभाष नागरगोजे, काकासाहेब चव्हाण यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.



stay connected