अमोलक शतक महोत्सवी वर्ष शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी सादर केलेले देखावे ठरले लक्षवेधी

 *अमोलक शतक महोत्सवी वर्ष शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी सादर केलेले  देखावे ठरले लक्षवेधी*      




      

आष्टी (प्रतिनिधी) -  अमोलक शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी सादर केलेले हलते देखावे लक्षवेधी ठरले . 

    कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे शतक महोत्सवी वर्ष सुरू आहे.  यानिमित्त गुरुवार दिनांक 12 जानेवारी रोजी गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती . विविध लोक कलावंतासह शालेय विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषामध्ये या शोभायात्रेत सहभागी झाले होते . मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला श्रीराम चले अयोध्या  हा हलता देखावा सादर केला . रथात राम , लक्ष्मण , सीता  यांच्या वेशात विद्यार्थी  बसलेले होते . याच शाळेच्या विद्यार्थ्यांचा कड्याचे ग्रामदैवत असलेले मौलाली बाबा दर्गा चादरीचा देखावा  ही कौतुकाचा विषय होता. त्याचप्रमाणे अमोलक बी फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा औषधाची दुनिया हा देखावा देखील लक्ष वेधून घेणारा ठरला . आयुर्वेदासह  विविध क्षेत्रातील औषधाचा वापर आणि त्याच्या विविध ज्ञानशाखा  याची चांगली माहिती यानिमित्ताने  मिळाली.  मोतीलाल कोठारी विद्यालयाचे मुख्याध्यापक मथाजी शिकारे , शिक्षक कृष्णा जाधव ,  रंजना जोशी , बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ  गफ्फार सय्यद , प्रा मधुराणी दळवी राऊत , प्रा महेश क्षीरसागर , प्रा माया महाडिक यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी हे देखावे सादर केले होते.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.